Nashik News: विंचूर (ता. निफाड) येथे सुरू असलेल्या शासकीय मका खरेदी केंद्रावर बारदान (गोण्या) उपलब्ध नसल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून खरेदी प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी मक्याने भरलेले सुमारे ३० ट्रॅक्टर खरेदी केंद्रावर उभे असून शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. .विंचूर येथील कृषी साधना महिला सहकारी फळे भाजीपाला खरेदी-विक्री संस्थेच्या माध्यमातून शासकीय मका खरेदी सुरू आहे. मात्र बारदान उपलब्ध नसल्याने खरेदी थांबली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बाजारभावापेक्षा प्रतिक्विंटल मक्याला सुमारे ७०० ते ८०० रुपये अधिक दर मिळत असल्यामुळे शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावरच मका विक्रीस प्राधान्य देत आहेत. सध्या या केंद्रावर मक्याला प्रतिक्विंटल सुमारे २४०० रुपये दर मिळत आहे, तर बाजार समित्यांमध्ये याच मक्याला १५०० ते १७०० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे..Maize Procurement: शासकीय मका खरेदी म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढणे.या खरेदी केंद्रावर एकूण ७८८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी १९८ शेतकऱ्यांकडून गेल्या दीड महिन्यात ९ हजार ७८० क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली आहे. मात्र अद्याप सुमारे ६०० मका उत्पादक शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत..Maize Procurement: हमीभावाने मका खरेदीत कमी उद्दिष्टाचा अडथळा.दरम्यान, बारदानाच्या कमतरतेमुळे खरेदी प्रक्रिया थांबल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन विस्कळीत होत आहे. प्रशासनाने तातडीने बारदान उपलब्ध करून खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू करावी तसेच वाढती गर्दी लक्षात घेता अतिरिक्त मका खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे..बारदान नसल्यामुळे विंचूर येथील मका खरेदी गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. मी येथे नोंदणी केली असून मला तातडीने पैशांची गरज आहे. दररोज खरेदी केंद्रावर फेऱ्या माराव्या लागत आहेत. हा मका बाजार समितीत विकल्यास प्रतिक्विंटल सुमारे ७०० रुपये कमी दर मिळेल. एका ट्रॅक्टरमध्ये सुमारे ३० क्विंटल मका असतो. त्यामुळे बाजारात विक्री केल्यास सुमारे २१ हजार रुपयांचे नुकसान होईल. प्रशासनाने तातडीने बारदान उपलब्ध करून द्यावे व मका खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी.- अशोक फापाळे, (मका उत्पादक शेतकरी, मरळगोई).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.