Bogus Seeds agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Seeds : कोल्हापुरात जिल्ह्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट, सूर्यफुलानंतर पोकळा पीकधोक्यात

Pokala Bogus Seed : २५ मार्चला बी टाकले. सुरुवातीला खत, पाण्याची मात्रा व्यवस्थित दिल्यामुळे चांगली उगवण झाली. पुढे वाढ होईना.

sandeep Shirguppe

Kolhapur Pokala Bogus Seed : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. आमशी गावात बनावट बियाण्यांमुळे पोकळ्याचा भाजीचा प्लॉट वाया गेला आहे. याबाबत दुकानदाराकडे दाद मागितली असता त्यांनी बेदखल केले आहे. याबाबत चौकशी होऊन नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी बाधित शेतकरी दीपाली पाटील, सुजाता सातपुते यांनी केली आहे.

आमशीत दीपक पाटील यांनी १८ गुंठे क्षेत्रावर भाजीपाला केला आहे. संदीप पाटील, सोपानदेव सातपुते वाटेकरी आहेत. पाच गुंठ्यात पोकळा करण्यासाठी तालुक्यातील एका गावातून बियाणे खरेदी केले. २५ मार्चला बी टाकले. सुरुवातीला खत, पाण्याची मात्रा व्यवस्थित दिल्यामुळे चांगली उगवण झाली. पुढे वाढ होईना.

संदीप पाटील व सोपान सातपुते यांना बियाणे खराब असल्याचे लक्षात आले. दीपक पाटील यांनी दुकानदाराशी संपर्क साधला असता, मात्र, ठीक आहे पाहूया असे सांगून त्याने बेदखल केले. १३ गुंठे क्षेत्रावर कोथिंबीरीसाठी त्याच दुकानातून बियाणे आणले होते. मात्र, दोन-तीन जातीचे बियाणे त्यामध्ये मिक्स असल्याचे पाहून ते दुकनदाराला बियाणे परत केले.

बोगस खराब बियाण्यामुळे प्लॉट वाया गेला आहे. हंगाम वाया गेला ७ आहे. आर्थिक नुकसान झाले असून नुकसानभरपाई मिळावी. खराब बियाणांमुळे प्लॉट हातचा गेला. दुकानदाराकडून बेदकल केले जाते. क्षेत्र जास्त नसले तरी अन्य शेतकऱ्यांचे नुकसान नको, यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दाद मागितल्याची माहिती दिपाली पाटील यांनी दिली.

याबाबत शेतकऱ्यांनी पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. यानंतर प्रतिनिधी क्षेत्राला फिल्डवर भेट देतील. यानंतर प्लॉटची पाहणी करावी लागेल असे मत तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार म्हणाले.

सूर्यफूल बियाण्याचाही घोळ असाच

मागच्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात सूर्यफुलाचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जात होते. परंतु काही बोगस कंपन्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात बियाणे खराब आणि बोगस दिल्याने जिल्ह्यातील पश्चिम आणि पूर्व भागातील सूर्यफूल गायब झाले आहे. कागल, करवीर, राधानगरी, हातकणंगले तालुक्यात सूर्यफुलाचे मोठी शेती केली जायची परंतु पेरलेल्या बियांची उगवणच झाली नसल्याने जिल्ह्यातून ९० टक्के सूर्यफूल गायब झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT