Onion Auction : हमाली, तोलाई, वाराई कपातीविना कांदा लिलाव सुरू

Onion Market : लेव्हीच्या मुद्द्यावरून मार्च अखेरपासून २५ दिवस बाजार समित्यांमधील ठप्प झालेले कांदा लिलाव अखेर सोमवार (ता. २२) पासून पुन्हा पूर्ववत सुरू झाले.
Onion
OnionAgrowon
Published on
Updated on

Nashik News : लेव्हीच्या मुद्द्यावरून मार्च अखेरपासून २५ दिवस बाजार समित्यांमधील ठप्प झालेले कांदा लिलाव अखेर सोमवार (ता. २२) पासून पुन्हा पूर्ववत सुरू झाले. मात्र कपातीच्या मुद्द्यावर पुन्हा काही ठिकाणी गोंधळ झाला असून, पिंपळगाव बसवंत देवळा व मालेगाव या ठिकाणी लिलाव पुन्हा बंद झाल्याची माहिती संबंधित बाजार समित्यांच्या सचिवांनी दिली.

Onion
Onion Harvesting : कांदा काढणीचा दर एकरी १२ हजार रुपयांवर

यंदा कांदा उत्पादकांना उत्पादनाच्या अंगाने फटका बसला आहे, तर काढणीपश्चात कांदा विक्रीसाठी ढगाळ वातावरण व जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना कांदा विक्रीशिवाय पर्याय नाही. मात्र लेव्हीच्या मुद्द्यावर हमाल, व्यापाऱ्यांत परस्परविरोध असल्याने शेतकऱ्यांची कांदा विक्री वाचून कोंडी झाली.

अशातच लग्नसराई, कौटुंबिक गरजा यामुळे शेतकऱ्यांना कांदा विक्रीशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी संघटनांनी खासगी कांदा खरेदी विक्री केंद्र सुरू केले. मात्र त्यास अपेक्षित प्रतिसाद नव्हता. खरेदीत विकेंद्रीकरण झाल्याने अपेक्षित स्पर्धा दिसून आली नाही. असे असताना नामपूर, सटाणा, देवळा, मालेगाव, सिन्नर, येवला, पिंपळगाव बसवंत, बाजार समितीत विक्रमी आवक झाली.

Onion
Onion Auction : पांढुर्ली उपबाजारात कांद्याचे लिलाव सुरू

दरम्यान, बाजार समितीचे कामकाज सुरू झाल्यानंतर माथाडी मंडळाने हमाल, मापाऱ्यांना कामकाजात सहभागी होण्याबाबत सूचित केले. त्यानुसार ते बाजार समितीमध्ये, खळ्यांवर दाखल झाले. मात्र कामकाजात हमाल, मापारी नको; याशिवाय आम्ही कुठलीही कपात करणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्याने पिंपळगाव बसवंत, देवळा व मालेगावात कांद्याचे लिलाव पुन्हा बंद पडले.

कांदा आवक, दरस्थिती (रुपये) (सोमवारचे दर)

बाजार समिती आवक

(क्विंटल) किमान कमाल सरासरी

नामपूर २०,८५० ३०० १,६०५ १,३००

विंचूर (लासलगाव) १९,०२६ ७०० १,५०० १,३७५

सटाणा १३,६१० ३०० १,६५० १,३००

पिंपळगाव बसवंत १३,००० ४५१ १,८३१ १,३५१

येवला ७,००० ४०० १,४७० १,३००

देवळा ६१५० ४५० १,८०० १,४००

नाशिक ४१४५ ५०० १,५०० १,३००

चांदवड ३२०० ८०५ १,६८४ १,३७०

लासलगाव ३१८० ७०० १,५०१ १,३००

सिन्नर २२३१ ५०० १,३५० १,२५०

आंदरसूल(येवला) १,००० ३०० १,४०० १,२७०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com