Shetkari Sangh Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Shetkari Sangh Kolhapur : शेतकरी संघावर जिल्ह्यातील सर्वच नेत्यांची सत्ता, अडीच तासात निकाल स्पष्ट

Kolhapur Shetkari Sangh : ३४ टक्के मतदान झालेल्या शेतकरी संघाच्या निवडणुकीचा निकाल अडीच तासात जाहीर करण्यात आला.

sandeep Shirguppe

Kolhapur Shetkari Sangh Election : मागच्या कित्येक दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघाच्या निवडणुकीवरून रणधुमाळी सुरू होती. अखेर सर्वपक्षीय नेत्यांनी आघाडीकरत शेतकरी संघावर एकहाती विजय मिळवला आहे. विरोधकांनी ज्या पद्धतीने सुरूवातीला ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला होता तो शेवटपर्यंत टिकून राहताना दिसला नाही. विरोधकांना सरासरी ७०० ते १६०० मतांवरच समाधान मानावे लागले.

अवघे ३४ टक्के मतदान झालेल्या शेतकरी संघाच्या निवडणुकीचा निकाल अडीच तासात जाहीर करण्यात आला. कसबा बावडा रमणमळा येथील शासकीय गोडावूनमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. यानंतर तासाभरातच निकालाची दिशा स्पष्ट झाल्यानंतर विजेत्या सर्वपक्षीय आघाडीने जल्लोष करत गुलालाची उधळण केली.

दरम्यान, झालेल्या मतांपैकी ९० टक्के मते पॅनेल टू पॅनेल, तर इतर १० टक्के मतदान संमिश्र आणि विरोधी पॅनेलला झाली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी काम पाहिले. तर त्यांना सहायक म्हणून मिलिंद ओतारी यांनी काम पाहिले.

या निवडणुकीत सर्वपक्षीय राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्व पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांनी केले. तर विरोधी स्व. बाबा नेसरीकर शेतकरी संघ बचाव आघाडीच्या माध्यमातून यशोधन शिंदे, मुकुंद पाटील, सुभाष देसाई, सुधा इंदुलकर व जान्हवी रावराणे यांनी लढत दिली.

शेतकरी संघ निवडणूक निकाल असा (कंसात मिळालेली मते):

व्यक्ती सभासद प्रतिनिधी विजयी उमदेवार: अमरसिंह माने (१०१०१ मते), सर्जेराव देसाई (१००२६ मते), अजित मोहिते (१००२५ मते), दत्तात्रय राणे (९९७३ मते), जी. डी. तथा गणपती दत्तात्रय पाटील (९९४४ मते), आनंदा बनकर (९९१३ मते) व दत्ताजीराव वारके (९७३५). संस्था

सभासद गट विजयी उमदेवार : आप्पासाहेब चौगुले (१२८१ मते), सुभाष जामदार (१२७९ मते), प्रवीणसिंह पाटील (१२७७ मते), विजयसिंह पाटील (१२७७ मते), बाबासाहेब शिंदे (१२७७ मते), प्रधान पाटील (१२६७ मते) व जयकुमार मनोळी (१२६६ मते).

महिला राखीव प्रतिनिधी विजयी

उमेदवार : अपर्णा पाटील (११२१६ मते) व रोहिणी पाटील (११०४८ मते). अनुसूचित जाती-जमाती विजयी उमेदवार : परशुराम कांबळे (११३८३ मते) बिनविरोध निवड : सुनील मोदी (इतर मागासवर्गीय प्रतिनिधी) व राजसिंह शेळके (भटक्या विमुक्त जाती)

नेसरीकर पराभूत

उमदेवार व त्यांना मिळालेली मते : व्यक्ती सभासदमधून यशोधन शिंदे-नेसरीकर (१६१८ मते) व मुकुंद पाटील (१३०९ मते), महिला राखीवमधून जान्हवी रावराणे (१३६८ मते) व सुधा इंदुलकर (१३६० मते). अनुसूचित प्रतिनिधी गटातून सुभाष देसाई (९४८ मते).

अनामत जप्त झालेले उमदेवार :

सुभाष देसाई (९४८ मते), प्रमोद कांबळे (१६४ मते), आकाराम पाटील (७०७ मते), जयसिंग पाटील (६५६ मते), सर्जेराव कानडे (७७ मते) व सुमित पाटील (८० मते). कागलमधून उच्चांकी मतदान बिद्री व आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत कागल तालुक्यातून सत्तारूढ आघाडीला उच्चांकी मतदान दिले होते. हाच पायंडा शेतकरी संघाच्या निवडणुकीतही कायम राहीला. संघाच्या निवडणुकीत व्यक्ती व संस्था गटातून विजयी पॅनेलला सर्वाधिक मतदान झाले आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत कागल तालुका मतदानात आघाडीवर राहिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

SCROLL FOR NEXT