Bedana Season
Bedana SeasonAgrowon

Bedana Season : बेदाण्याच्या हंगामाला प्रारंभ

Bedana Market : यंदाच्या हंगामातील बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी शेडवर बेदाणा निर्मितीसाठी उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
Published on

Sangli News : यंदाच्या हंगामातील बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी शेडवर बेदाणा निर्मितीसाठी उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. नागज (ता. कवठेमहांकाळ) पट्ट्यात सुमारे ५० टक्के बेदाणा शेडवर तयार होत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्मितीस गती येईल, अशी आशा बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज परिसरासह मिरज तालुक्याचा पूर्व भाग, जत तालुक्याच्या पूर्व भागासह अन्य भागात बेदाणा तयार केला जातो. दरवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापासून बेदाणा निर्मिती सुरू होते.

मात्र गतवर्षी द्राक्ष हंगाम धरण्याच्या पाऊस झाल्याने फळ छाटणी मागे पुढे झाली होती.त्यामुळे यंदाचा हंगाम फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू झाला होता.

Bedana Season
Bedana Market : गेल्या महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून

यंदाही द्राक्ष हंगामाच्या प्रारंभी नैसर्गिक संकट आले. पण शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत बागा साधल्या. यंदाचा हंगामाची पूर्व तयारी डिसेंबर महिन्यापासून सुरू झाली. नागज, जुनोणी, यासह अन्य भागातील बेदाणा शेड मालकांनी शेडच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. बेदाणा दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.

Bedana Season
Bedana Market : बेदाणा बाजारात काय घडतंय ?

बेदाणा तयार करणाऱ्या पट्ट्यात सुमारे ४ हजार शेड आहेत. त्यापैकी ५० टक्के बेदाणा शेड बेदाणा निर्मितीसाठी तयार झाले आहेत. बेदाणा शेडवर राज्यासह परराज्यातील मजूरही दाखल झाले आहेत.

सध्या द्राक्षाची विक्री झालेल्या द्राक्षापासून बेदाणा तयार करण्यासाठी शेतकरी पुढे येवू लागले आहेत. थॉमसन, तास-ए- गणेश, माणिक चमन, क्‍लोन टू, सोनाका या द्राक्षाच्या वाणापासून बेदाणा तयार होते.

सध्या बेदाण्याचे असणारे द्राक्षाचे वाणही बेदाणा निर्मितीसाठी येवू लागले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बेदाणा निर्मितीस गती येईल.गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे बेदाणा निर्मितीस अडथळे आल्याने बेदाणा सुकण्यास विलंब लागत होता. सध्या बेदाणा तयार होण्यासाठी पोषक वातावरण असल्याने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना दिसाला मिळत आहे.

द्राक्ष विक्री होवून शिल्लक राहिलेल्या द्राक्षापासून बेदाणा तयार केला जात आहे. दहा ते पंधरा दिवसांनंतर बेदाणा निर्मितीस गती येईल. सध्या पोषक वातावरण आहे. त्यामुळे बेदाण्याला अडचणी नाहीत.
- सुनील माळी, बेदाणा शेड मालक, केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com