Textile Export : युरोप, अमेरिकेतील कापड निर्यातीला फटका

Cotton Market : इस्राईल - हमास युद्धामुळे सुएझ कालवा बंद आहे. यामुळे देशासह इतर भागातून युरोप, अमेरिकेतील कापड व इतर बाबींची निर्यात मागील अनेक दिवसांपासून ठप्प आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : इस्राईल - हमास युद्धामुळे सुएझ कालवा बंद आहे. यामुळे देशासह इतर भागातून युरोप, अमेरिकेतील कापड व इतर बाबींची निर्यात मागील अनेक दिवसांपासून ठप्प आहे. परिणामी सुताची मागणी घटली असून, देशातील ७० टक्के सूतगिरण्या आजघडीला बंद आहेत.

सूतगिरण्या अडचणीत आल्याने देशात कापूस दर मागील चार हंगामांमधील नीचांकी स्थितीत पोचले आहेत. रशिया - युक्रेन युद्ध सुरू झाल्याने युरोप, अमेरिकेत महागाई वाढली. वीज, इंधन, अन्नासंबंधी तेथील नागरिकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यात इस्राईल व हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्याने आखातातही तणाव वाढला. परिणामी सुएझ कालव्याद्वारे सुरू असलेली निर्यात ठप्प झाली.

Cotton Market
Cotton Market : कापसाच्या दोन लाख गाठींची दररोज आवक

हा कालवा बंद असल्याने जहाजांना आफ्रिका खंडाचा मोठा वळसा, फेरा पार करून जावे लागत आहे. त्यात दीड महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागत असून, जहाजाद्वारे होणारी मालवाहतूक रखडत सुरू आहे. हीच वाहतूक पूर्वी सुएझ कालव्याद्वारे १८ ते १९ दिवसांत पूर्ण करणे शक्य होते. तसेच जहाज मालवाहतुकीचे दर ६०० टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे युरोप, अमेरिकेतील कापडाची देशातून होणारी पाठवणूक रखडली आहे.

अमेरिका - चीनमधील तणावानंतरचा लाभही नाही

अमेरिकेने चीनच्या कापडावर बंदी घातली होती. यामुळे इतर कापड उत्पादक देशांमधील कापडाचा उठाव वाढला असता. कारण चीनच्या कापडाची मोठी बाजारपेठ अमेरिकेनंतर युरोपात आहे. जगात चीननंतर भारत, पाकिस्तान व बांगलादेश हे मोठे कापड उत्पादक देश आहेत. परंतु युद्धामुळे कापड उद्योगाच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.

Cotton Market
Cotton Market : कापूस कोंडीत छोट्या वायद्याची निकड

सूतगिरण्यांचे काम संथ

युरोप, अमेरिकेतील कापड निर्यात यंदा ख्रिसमच्यापूर्वी वाढण्याची अपेक्षा होती. परंतु या काळातही कापडास मागणी आली नाही. देशांतर्गत बाजारात कापडाच्या विक्रीसंबंधी मोठी संधी नाही. यामुळे देशातील कापड उद्योगाची कोंडी झाली आहे. परिणामी सुताचा उठाव कमी झाला आहे.

देशातील सूतगिरण्यांना दर महिन्याला ३० ते ३२ लाख कापूसगाठींची (एक गाठ १७० किलो रुई) गरज असते. देशात सुमारे ७५२ सूतगिरण्या आहेत. यातील ४०० पेक्षा अधिक सूतगिरण्या तमिळनाडू व लगतच्या भागात आहेत. परंतु अनेक सूतगिरण्या बंद आहेत. तर काहींचे कामकाज कमी क्षमतेने सुरू असून, कापूसगाठींची मागणी दर महिन्याला १६ ते १७ लाख गाठी एवढीच झाली आहे.

यातच भारतीय कापूस सध्या अमेरिका, ब्राझीलच्या कापसाच्या तुलनेत १० टक्के महाग आहे. याचाही परिणाम कापूसगाठींच्या निर्यातीवर यंदा झालेला असल्याची माहिती मिळाली. सूतगिरण्या अडचणीत असल्याने कापूसगाठींची मागणी कमी झाली आहे. परिणामी कापूस बाजार अस्थिर व दबावात आहे. कापसाचे दर कोविडच्या सुरुवातीला जेवढे होते, तेवढेच सध्या आहेत. कापूस बाजाराचे भविष्य काय राहील, या बाबत जाणकार कुठलेही भाकीत करणे सध्या टाळत आहेत.

जगात अस्थिरता आहे. युद्धाची स्थिती असल्याने कापड उद्योगातील गुंतवणूक थांबल्याची स्थिती आहे. सूतगिरण्यांची यंदाची स्थिती आणखीच बिकट बनली आहे. कारण सुताला उठावच नाही. उठाव येईल की नाही, याबाबतही शंका आहेत.
- दीपक पाटील, संचालक, वस्त्रोद्योग महासंघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com