Shetkari Sangh Election : शेतकरी संघाच्या निवडणुकीला सभासदांनी फटकारलं, फक्त ३४ टक्के मतदान

Shetkari Sangh Leaders : शेतकरी संघाच्या निवडणुकीत नेहमी एकमेकांवार आगपाखड करणारे नेते मात्र या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एकत्र आले.
Shetkari Sangh Kolhapur
Shetkari Sangh KolhapurAgrowon
Published on
Updated on

Kolhapur Shetkari Sangh Election : शेतकरी संघाच्या निवडणुकीची महिनाभरापासून रणधुमाळी सुरू आहे. ३६ हजारांपेक्षा जास्त सभासद असलेल्या शेतकरी संघासाठी काल मतदान झालं. परंतु १९ पैकी १७ जागांसाठी व्यक्ती व संस्था सभासद गटांसाठी सरासरी ३४.४ टक्के मतदानांची नोंद झाली.

व्यक्ती सभासद गटातील ३६ हजार १८४ मतदारांपैकी ११ हजार ५०१ जणांनी; तर संस्था गटामधील १ हजार ५७१ पैकी १ हजार ३५० मतदारांनी आपला हक्क बजावला. दोन्ही गटांसाठी केवळ १२ हजार ८५१ मतदान झाले. आज रमणमळा येथील शासकीय गोडावून येथे सकाळी पासून मतमोजणी सुरू होईल. दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील, असा अंदाज आहे.

शेतकरी संघाच्या निवडणुकीत नेहमी एकमेकांवार आगपाखड करणारे नेते मात्र या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एकत्र आले. राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी विरुद्ध स्व. बाबा नेसरीकर शेतकरी संघ बचाव आघाडीचे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

सकाळी ८ वाजल्यांपासून जिल्ह्यातील ५९ केंद्रांवर मतदान सुरू झाले. संस्था गटात सर्वाधिक ९६.९७ टक्के मतदान कार्वे ता. चंदगड) येथे झाले. याठिकाणी ३३ पैकी ३२ मतदारांनी मतदान केले.

Shetkari Sangh Kolhapur
Shetkari Sangh Kolhapur : शेतकरी संघ वाचणार की मोडकळीस येणार? संघासाठी उद्या मतदान

या गटात एकूण १५७१ मतदान होते. यापैकी एकूण १३५० मतदान झाले आहे. व्यक्ती सभासद गटामध्ये मौजे सांगाव (८०.६६), कागल (७७.४५), बिद्री (६५ टक्के), पाडळी खुर्द (५५.५४ टक्के) येथे अधिक मतदान झाले; तर कोल्हापूर शहरातील अकरा मतदान केंद्रांवर १.८६ ते ९.८२ दरम्यान सर्वांत कमी मतदान झाले.

शेतकरी सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्नशील होते. मात्र, पॅनेलमध्ये कोणकोण उमदेवार असावेत यावरून मतभेद झाल्याने निवडणूक लागली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील व खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वपक्षीय पॅनेल तयार झाले. तर विरोधी यशोधन शिंदे यांच्यासह इतरांनी नेसरीकर पॅनेल तयार केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com