Cashews Seed Rate agrowon
ॲग्रो विशेष

Cashews Seed Rate : काजूचा दर वधारला; शेतकऱ्यांच्या प्रतिक्षेत व्यापारी बाजारात, उलाढाल मंदावलेली

Kolhapur Cashew Rate : प्रति किलो १०० रुपये दराने व्यापाऱ्यांनी काजू बीची खरेदी केली. चांगल्या व दर्जेदार काजू बीला १०५ रुपये दर मिळाला.

sandeep Shirguppe

Kolhapur Chandagad Cashews : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील आजरा परिसरात मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन घेतले जाते. आठवडी बाजारात काजूची आवक होत आहे परंतु ही आवक अत्यंत कमी होत असल्याने बाजारातील उलाढाल मंदावली आहे. आठवडी बाजारात काजू बीचा दर १० रुपयाने वाढला आहे. प्रति किलो १०० रुपये दराने व्यापाऱ्यांनी काजू बीची खरेदी केली. चांगल्या व दर्जेदार काजू बीला १०५ रुपये दर मिळाला.

दरम्यान काजू बीला चांगला दर मिळत असला तरी बाजारात काजू बियांची आवक कमीच राहिली. आजरा बाजारात चार टन काजू बी जमा झाला. बाजारात काजूची उलाढाल थंडा... थंडा... कुल.. कुल राहिली आहे. आजही काजू उत्पादक शेतकऱ्यांची प्रतीक्षा राहिली.

बाजारात दहा ते बारा काजू व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी काटे लावले होते. आज दिवसभरात त्यांच्याकडे सुमारे चार टन काजूची आवक झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. मे महिन्याचा दुसरा आठवडा आला तरी काजू बीची आवक मंदावलेली आहे. काजू बीचा दर गत आठवड्यात ९० रुपये होता. आज तो १० रुपयांनी वाढला आहे.

दर वधारल्यामुळे बाजारात शेतकरी मोठ्या प्रमाणात काजू बी आणतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना होती; पण हा बाजारही थंडच राहिला. काजू बीची म्हणावी तशी उलाढाल झालेली नाही.

काजू उत्पादक शेतकऱ्यांनी याही बाजाराला पाठ फिरवली आहे. पुढील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात काजू बीची आवक होईल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे.

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने काजू उत्पादन यंदा घटले आहे. दर्जेदार काजू बीही मिळत नाही. परदेशी काजूबी आलेली नसल्याने १० ते १५ रुपये दर वाढला आहे. १०० ते १०५ रुपये दर मिळत असून तो ११० रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. आणखीन दर वाढेल, या आशेने शेतकऱ्यांनी माल बाजारात आणलेला नाही. वळवाचा पाऊस काजूला हातभार देईल. पुढील आठवड्यापासून आवक वाढेल.

- देवीदास पाचवडेकर, काजू व्यापारी, आजरा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

Onion Farmers Issue: ‘बफर स्टॉक’चा कांदा शेतकऱ्यांच्या मुळावर

Sugarcane Transport Rule: ऊस वाहतुकीमध्ये बैलांना क्रूर वागवू नका; साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

SCROLL FOR NEXT