Drought Crisis : फळबागांसाठी हेक्टरी एक लाखाची मदत द्या

Water Scarcity : मराठवाड्यातील दुष्काळी फळबागांसाठी शासनाने हेक्टरी एक लाखाची मदत करावी, अशी आग्रहाची मागणी मराठवाडा पाणी परिषदेने केली आहे.
Orchard Farming
Orchard Farming Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील दुष्काळी फळबागांसाठी शासनाने हेक्टरी एक लाखाची मदत करावी, अशी आग्रहाची मागणी मराठवाडा पाणी परिषदेने केली आहे. यासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, कृषी सचिवांना ई-मेलद्वारे, तर विभागीय कृषी सहसंचालकांना प्रत्यक्ष भेटून शुक्रवारी (ता. १०) निवेदन देण्यात आले. त्यानुसार मराठवाड्याची अर्थव्यवस्था ही कृषी आधारित आहे.

सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्याचे कधीही भरून निघणार नाही एवढे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळाच्या दुष्ट चक्रामुळे बेरोजगारी, स्थलांतरासह, शेतकरी आत्महत्येपर्यंत येऊन पोहोचले आहे. या वर्षी मराठवाड्यात अल्प पर्जन्यमानामुळे खरीप व रब्बी पिकाचे नुकसान झाले. सद्यःस्थितीत भूजल पातळी खालावलेली असून बोअरवेल व विहिरीचे पूर्ण पाणी संपलेले आहे.

Orchard Farming
Water Crisis : भूजल पातळी खालावल्याने गिरणा पट्ट्यात जलसंकट

फळबागा क्षेत्रात २५ किलोमीटर क्षेत्रातही पाणी उपलब्ध नाही. फळबागधारक शेतकऱ्यांनी आहे ती पूर्ण आयुष्याची पुंजी खर्च करून फळबागा जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु ९ ते १४ एप्रिल २०२४ दरम्यान मराठवाड्यात अवकाळी, गारपीट पाऊस झाल्यामुळे सहाशेपेक्षा जास्त गावातील सहा हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील फळबाग धारकांना मोठा फटका बसला.

Orchard Farming
Water Crisis : नाशिक विभागावर पाणी संकट; धरणातील पाणीसाठा आला २८ टक्क्यांवर; १२ मे पर्यंत अर्ज केल्यास मिळणार आवर्तन

आता सद्यःस्थितीत पाणीच नसल्यामुळे वर्षानुवर्षे मुलासारख्या जोपासलेल्या मोसंबी, डाळिंब इत्यादी फळबागा शेतकऱ्यांना नाइलाजास्तव तोडाव्या लागत आहेत. जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोसंबीचा तर देशभरात नावलौकिक आहे. या कठीण प्रसंगी फळबागधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत नाही केल्यास या फळबागा नामशेष होतील.

अवकाळी गारपिटीत नुकसान झालेल्या, पाण्याअभावी जळालेल्या किंवा शेतकऱ्यांनी काढून टाकलेल्या व पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या फळबागा जगविण्यासाठी सरसकट पंचनामे करून शासनाने प्रतिहेक्टरी एक लाखाची मदत करून मराठवाड्यातील फळबागधारक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मराठवाडा पाणी परिषदेची आग्रहाची मागणी केली आहे. या निवेदनावर मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे, उपाध्यक्ष मनोहर सरोदे, रवींद्र बोडखे, रवींद्र सातदिवे, भाऊसाहेब मते, अनिल चौधरी यांच्या सह्या आहेत.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी फळबागा हे नगदी व हमखास उत्पन्न देणारे पीक आहे.कृषी उद्योगांना कच्चामाल देण्याचे काम हे फळबागधारक करतात. परंतु मराठवाड्यातील सततच्या दुष्काळ व फळ पिकावरील रोगामुळे फळबागधारक शेतकरी त्रस्त आहेत. अडचणीत सापडलेल्या फळबागधारकांना शासनामार्फत आर्थिक मदत न केल्यास या फळबागा नामशेष होतील व मराठवाड्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल.
- नरहरी शिवपुरे, अध्यक्ष मराठवाडा पाणी परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com