Water Crisis : जायकवाडीत उरले सात टक्के उपयुक्त पाणी

Water Storage : मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात एक जून २०२३ पासून आजपर्यंत ८७६.८९ दलघमी पाण्याची आवक झाली. पाऊस कमी झाल्याने प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठा झालाच नाही.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambbhajinagar News : जिल्ह्यातील जायकवाडी अर्थात नाथ सागर या सर्वात मोठ्या प्रकल्पात केवळ सात टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पातून कालव्याद्वारे होणारा काही प्रमाणातील विसर्ग थांबवल्यामुळे पाणीसाठा कमी होण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे.

मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात एक जून २०२३ पासून आजपर्यंत ८७६.८९ दलघमी पाण्याची आवक झाली. पाऊस कमी झाल्याने प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठा झालाच नाही. १०२ टीएमसीच्या या प्रकल्पात गतवर्षी आजच्या तारखेत प्रकल्पात जवळपास ४७.२३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत आत्ताचा उपयुक्त पाणीसाठा जवळपास सहा ते सात पट कमी आहे.

Water Scarcity
Water Crisis : राज्यातील धरणांतील पाणीसाठा आला २७ टक्कांवर; टँकर सख्येतही झपाट्याने वाढ

गेल्यावेळी च्या संपूर्ण पावसाळ्यात जायकवाडी लाभक्षेत्रात जवळपास ४७३ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे अपेक्षित पाणी आवक होण्यात अडचण आली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवातीला व शेवटी डाव्या व उजव्या दोन्ही कालव्यांतून होणारा विसर्ग थांबविण्यात आला.

त्यामुळे जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने कमी होण्याला थोडा ब्रेक लाखला आहे. शिवाय आणि साठा कमी झाल्याने प्रकल्पातील बाष्पीभवनाचा वेगही कमी झाला आहे. प्रकल्पाच्या एकूण क्षमतेनुसार जवळपास २६ टीएमसी प्रकल्पाचा मृत पाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठा संपला की मृत साठ्यातून पाणी उचलल्याशिवाय पर्याय उरणार नाही.

Water Scarcity
Water Crisis : भूजल पातळी खालावल्याने गिरणा पट्ट्यात जलसंकट

गाळ मोजणार अन् काढणार तरी कधी?

जायकवाडी प्रकल्प म्हणजे मराठवाड्यासाठी संजीवनी बुटीप्रमाणे काम करतो. दरवर्षी प्रकल्प भरला की त्या प्रकल्पात गाळ किती याची मोजमाप करण्याची किंवा तो काढण्याची तसदी घेतली जात नसल्याची दिसते. माहितीनुसार २०१३ मध्ये प्रकल्पाच्या पाण्यावर बोटीने विविध ठिकाणच्या खोलीच्या नोंदी घेऊन गाळाचा अंदाज घेतला होता.

त्यानंतर पुन्हा कधी प्रकल्पात गाळ किती याविषयी कुणी प्रश्‍न किंवा प्रशासनाकडून त्याविषयी हालचाल केल्याच ऐकिवात नाही. एकीकडे शासनाचं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियान आणि दुसरीकडे मात्र जायकवाडीसारख्या जीवनवाहिनी असणाऱ्या प्रकल्पात गाळ किती याचीच अनभिज्ञता, त्यामुळे याविषयी आता तरी तातडीने हालचाली होतील का हा खरा प्रश्‍न आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com