Kolhapur Flood agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Flood : महापुराच्या धास्तीने कोल्हापूर प्रशासन अलर्ट, पण अद्याप पावसाची प्रतिक्षाच

Flood In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ आणि २०२१ मध्ये आलेल्या महापुराचा जास्त फटका करवीर तालुक्यातील ५४ गावांना बसला होता.

sandeep Shirguppe

Kolhapur District Rain : कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस नाही. मात्र, ढगाळ वातावरणामुळे जेवढी पावसाची प्रतीक्षा केली जात आहे, तेवढीच महापूर येऊ नये, अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, या सर्व पातळ्यांवर करवीर तालुक्यातील पूरबाधित ५४ गावांमधील यंत्रणा सज्ज ठेवली जात आहे. प्रत्येक गावात पूरस्थिती निर्माण झाल्यास कोणकोणती कामे करावीत, बचावकार्य, स्थलांतर कोठे होणार, या सर्वांचा आराखडा पूर्ण केला आहे, तर आरे, चिखली, आंबेवाडी, गांधीनगर, वळीवडे आणि कोल्हापूर शहराला सर्वाधिक फटका बसत असल्याने अशा ठिकाणी विशेष लक्ष दिले जात आहे.

जिल्ह्यात २०१९ आणि २०२१ मध्ये आलेल्या महापुराचा जास्त फटका करवीर तालुक्यातील ५४ गावांना बसला होता. यामध्ये कोल्हापूर शहरासह चिखली, आंबेवाडी, गांधीनगर आणि वळीवडे गावांत अधिक नुकसान झाले. त्यादृष्टीने करवीर पंचायत समितीकडून पूरबाधित सर्व गावांसह जादा फटका बसलेल्या गावांकडे लक्ष दिले जात आहे. कावणे, चुये, कोतोली, महे, भुयेवाडी गावांमध्ये भूस्खलनाचा धोका असतो. या ठिकाणी विशेष दक्षता घेण्याबाबत नियोजन केले आहे.

करवीर पंचायत समितीकडून तालुक्यातील पूरबाधित गावांकडून शाळा, आरोग्य केंद्र, स्थलांतराच्या ठिकाणांची माहिती घेतली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून ही सर्व माहिती भरून त्यानुसार अधिकाऱ्यांच्या नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली, तर महे, शिरोली, बीड, आरे, पाडळी खुर्द, बालिंगा, नागदवेवाडी, दोनवडे, वाकरेसह अन्य गावांमध्ये प्राथमिक किंवा आपत्कालीन व्यवस्था तत्काळ मिळाव्यात, यासाठी ग्रामपंचायतीच्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

कर्नाटक सरकारशी क्षणाक्षणाला संपर्क

कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सरकार संयुक्तरीत्या नियंत्रण करेल. शासनाच्या पातळीवर तशा समित्यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवली आहे. कोल्हापूर प्रशासन आणि सांगली जिल्ह्यातील प्रशासनाचे अधिकारी कर्नाटक सरकारशी क्षणाक्षणाला संपर्क ठेवणार आहेत.

करवीर तालुक्यातील पूरबाधित गावांतील ग्रामपंचायतींकडून आपत्ती व्यवस्थापनासंबंधी सूचना दिल्या आहेत. आवश्‍यक ती सर्व माहिती एका अहवालाद्वारे घेतली आहे. त्यानुसार पूरस्थिती निर्माण झाली तर नियोजनानुसार काम केले जाईल.

-विजय यादव, गटविकास अधिकारी, करवीर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Legislative Assembly: कृषिमंत्री कोकाटे यांची पावसाळी अधिवेशनाकडे पाठ

Pune APMC Scam: बाजार समिती संचालकांची ‘ईडी’मार्फत चौकशी करा

Guru Pournima 2025: गुरुपौर्णिमेला गुरुकुंजात गुरुदेवभक्तांची मांदियाळी

Pomegranate Price: डाळिंबाच्या एका क्रेटला साडेसहा हजार रुपये दर

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील गैरप्रकार बिहारमध्ये चालू देणार नाही

SCROLL FOR NEXT