Ujani Dam Storage : उजनीत ३.१९ टीएमसी पाण्याची आवक

Ujani Dam : धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक
Ujani Dam
Ujani DamAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील अनेक भागात मॉन्सून बरसत आहेत. प्रामुख्याने उजनी धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे उजनी धरणांत नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे. मागील चार ते पाच दिवसांमध्ये धरणात नव्याने सुमारे ३.१९ टीएमसी पाण्याची आवक झाल्याने धरणांतील पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण क्षेत्रात मागील आठवडाभरापासून जोरदार पाऊस पडत आहे.
या पावसामुळे दौंडमधून उजनीत विसर्ग सुरू झाला आहे. धरणाची एकूण क्षमता ११७.२१ टीएमसी एवढी आहे. मागील दहा दिवसांत उजनीच्या पाणीपातळीत
जवळपास पाच टक्के वाढ झाली आहे. सध्या दौंडमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग उजनीत सुरू आहे. सध्या उजनीचा पाणीसाठा उणे २८.९५ टीएमसी
म्हणजेच उणे ५४.०४ टक्के एवढा आहे. मागील आठवड्यात ही टक्केवारी उणे ५९ टक्के एवढी झाली होती. धरणांच्या पाणीपातळी ४९८.३२० मीटर
एवढी आहे.

Ujani Dam
Pune Dam Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांत दोन दिवसांत ७.७० टीएमसी पाण्याची आवक

धरण परिसरात १४१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. बुधवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यंत उजनीत ०.९९ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली होती. गेल्या वर्षी याच काळात धरणांत उणे १४.५३ टीएमसी म्हणजेच उणे २७ टक्के पाणीसाठा होता. परंतु गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसामुळे चालू वर्षी धरणात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या उजनी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे धरणात आवक कमी झाली आहे. परंतु जूनमध्ये सुरुवातीच्या काळात चांगली आवक झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे धरण अत्यंत महत्त्वाचे आहे. या धरणाच्या पाण्यावर सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र अवलंबून आहे. मागील वर्षी अवघे ६४ टक्के धरण भरल्याने उन्हाळ्यात वेगाने पाणीसाठा कमी झाला.

मंगळवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंत उजनी क्षेत्रात झालेला पाऊस, पाण्याची आवक (टीएमसीमध्ये)
तारीख -- झालेला पाऊस, मिलिमीटर -- झालेली आवक
८ जून --- १ --- ०.०६
९ जून --- ४८ --- ०.८२
१० जून --- ३ --- ०.५५
११ जून --- ३ --- ०.७७
१२ जून --- ६० --- ०.९९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com