Pune News: राज्यात उन्हाचा चटका, उकाडा आणि तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. आज (ता. २६) राज्यात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तमिळनाडूपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. गुजरातच्या किनाऱ्यालगतच्या अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याने राज्यात ढगाळ हवामान होऊन पावसाला पोषक वातावरण होत आहे..Unseasonal Rain Alert : पूर्व विदर्भात आजही वादळी पावसासाठी पोषक हवामान.बुधवारी (ता. २५) पंजाबच्या गुरुदासपूर येथे देशाच्या सपाट भुभागावरील नीचांकी ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये तमिळनाडूच्या एरोडे येथे देशातील उच्चांकी ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..विदर्भासह राज्यात काही ठिकाणी उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २६) राज्यात ढगाळ आकाशासह तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा देखील वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..बुधवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३३---१६.५अहिल्यानगर---३४.८---१६.३धुळे---३५.०---१२.४जळगाव---३५.८---१८.२जेऊर---३५.५---१५कोल्हापूर---३३.७--२१महाबळेश्वर---२९.१---१७.१.Maharashtra Rain Forecast: यवतमाळ, चंद्रपूर येथे वादळी पावसाची शक्यता.मालेगाव---३५---१६.२नाशिक---३३.४---१५.६सांगली---३४.७---१९.७सातारा---३३.७---१७.५सोलापूर---३५---२०.८सांताक्रूझ---३४---२०.३डहाणू---३२.८---१८.६रत्नागिरी---३३.६---१९.७.छत्रपती संभाजीनगर---३३.४---१८.१धाराशिव---३२.९---१७.४परभणी---३२.४---१९.२परभणी (कृषी)---३१.५---१७अकोला---३६.८---१९.९अमरावती---३५.६---१७.५भंडारा---३१---१८बुलडाणा---३३---२०.ब्रह्मपुरी---३२.६---१७.६चंद्रपूर---३४---२०.४गडचिरोली---३१.६---१६.६गोंदिया---३२.२---१५.४नागपूर---३१.९---१७.४वर्धा---३४---१७.६वाशीम---३४.६---१५.४यवतमाळ---३३.२---१९.२.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१२.४---३५.८पश्चिम महाराष्ट्र---१५---३५मराठवाडा---१७---३३.४विदर्भ---१५.४---३६.८कोकण---१८.६---३४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.