Election  Agrowon
ॲग्रो विशेष

Teachers Constituency Election : नाशिक शिक्षक मतदार संघात किशोर दराडे विजयी

Election Update : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात शांततेत पार पडली

Team Agrowon

Nashik News : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी द्विवार्षिक निवडणुकीत किशोर दराडे (शिवसेना) यांना तपशीलवार मतमोजणीअंती २६ हजार ४७६ मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६  इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा १९ व्या वगळणीफेरी अखेर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची ३२,३०९ मते घेऊन नाशिक शिक्षक मतदार संघातून ते निवडून आले, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जाहीर केले.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण ३० टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण ६४,८५३ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी ६३,१५१ मते वैध ठरली तर १,७०२ मते अवैध ठरली. विजयी घोषणेसाठी ३१,५७६ इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांचे मतमोजणी सुरू झाली. यामध्ये १९ व्या बाद फेरीनंतर संदीप गुळवे (पाटील) हे बाद झाले असून अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारांमध्ये झाली. यामध्ये जिंकण्यासाठी ३१,५७६ इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता. १९ व्या फेरीअखेर बाद झालेल्या उमेदवारांची मते पसंती क्रमानुसार संबंधित उमेदवारांना देण्यात आली.

श्री. दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची ५,०६० मते मिळवून विजयी झाले. विवेक कोल्हे याना तिसऱ्या फेरीअखेर १७३९३ मते पडली असून सर्वाधिक पसंती क्रमाची ६,०७२ मते पडली. मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने डॉ. गेडाम यांनी दराडे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.

या वेळी निवडणूक निरीक्षक विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नंदूरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त नीलेश सागर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Sugarcane Protest: कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऊस आंदोलन पेटले, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Sugarcane Crushing Season: ‘द्वारकाधीश’चे ६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Rabi Sowing: अहिल्यानगरमध्ये रब्बी पेरणी दहा टक्के

Cotton Procurement: शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा

Poultry Exports: पोल्ट्री निर्यातीत दुपटीने वाढ, भारतीय अंड्यांना जगभरातून मोठी मागणी, युएई ठरला सर्वात मोठा खरेदीदार

SCROLL FOR NEXT