Co-Operative Election : सहकार पंढरी असलेल्या जिल्ह्यात ४४४ दाव्यांच्या सुनावण्या प्रलंबीत

Co-Operative Election Cases : रिव्हीजन म्हणून गेल्या वर्षभरात ६९० दावे दाखल झाले होते, त्यापैकी ४०४ दाव्यांची निर्गत करण्यात आली तर २८६ दावे प्रलंबित आहेत.
Co operative Election
Co operative Electionagrowon

Kolhapur Politics News : कोल्हापूर जिल्ह्यात सहकाराचे जाळे विणले गेले असल्याने सहकार पंढरी अशी ओळख जिल्ह्याची राहिली आहे. अगदी कमी सभासद असलेल्या सहकारी संस्थेची निवडणूक अत्यंत चुरशीने होत असते.

यातून वर्चस्वासाठी मोठी चढाओढ होते. त्यातून निर्णय आपल्याविरोधात गेला तर त्यासाठी विभागीय सहनिबंधकांकडे दावा दाखल करून त्यावर दाद मागण्याची तरतूद आहे. गेल्या वर्षभरात कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातून विभागीय सहनिबंधकांकडे १०७४ दावे दाखल झाले. त्यापैकी ६३० दाव्यांवर निकाल दिला असून अजूनही ४४४ दाव्यावरील सुनावणी प्रलंबित आहे.

संस्थेविरोधात भ्रष्टाराची तक्रार झाली असेल किंवा संस्थेची सहकार कायदा कलम ७८ नुसार चौकशी सुरू असेल तर त्याविरोधात विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल करण्याची तरतूद आहे.

त्याशिवाय एखाद्या संस्थेत गैरव्यवहार झाला असेल आणि जिल्हा उपनिबंधकांकडून अशा संस्थेच्या संचालकांवर जबाबदारी निश्‍चित झाली असेल तर या कारवाई विरोधात विभागीय सहनिबंधकांकडे दाद मागण्यात येते.

त्याचबरोबर पोटनियम दुरूस्ती, संस्था अवसायनात काढली असेल किंवा नोंदणी नाकारली असेल तर अशा संस्थांकडून या कार्यालयाकडे अपील दाखल करून न्याय मागितला जातो. अशा स्वरूपाचे गेल्या वर्षभरात ३८४ दावे दाखल झाले, त्यापैकी २२६ दाव्यांचा निकाल लागला असून १५८ दावे प्रलंबित आहेत.

Co operative Election
Kolhapur Rain : कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला; ७ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून ११०० क्युसेक विसर्ग

४०४ दाव्यांची निर्गत, २८६ प्रलंबित

सहकारी संस्थांकडून रिव्हीजन आणि अपील अशा स्वरूपाचेच दावे दाखल केले जातात. रिव्हीजन स्वरूपाच्या दाव्यात संस्थेविरोधात सहकार विभागाने एखादी कारवाई सुरू केली असेल तर त्याला विभागीय सहनिबंधकांकडे दाद मागितली जाते. फक्त रिव्हीजन म्हणून गेल्या वर्षभरात ६९० दावे दाखल झाले होते, त्यापैकी ४०४ दाव्यांची निर्गत करण्यात आली तर २८६ दावे प्रलंबित आहेत.

दृष्‍टिक्षेपात तीन जिल्ह्यांतील दाव्यांची माहिती (१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ )

अपील दावे १४४, २४०, ३८४, २२६, १५८.

रिव्हीजन दावे ३०३, ३८७, ६९०, ४०४, २८६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com