Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील २०२५ मधील खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. तसा अहवालही प्रशासनाने पाठवला आहे. आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यासह विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफीसाठी दिलासा मिळणार आहे. जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ४६.०८ इतकी आहे..प्रशासनाने २०२५ मधील खरीप हंगामाचा अंतिम पैसेवारीचा अहवाल सरकारकडे १५ डिसेंबर २०२५ रोजी पाठवला आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ७१८ गावे असून, त्यापैकी खरीप पिकांखालील ३५८ तर रब्बी पिकाखालील ३६० गावांचा समावेश आहे. सरकारच्या आदेशानुसार तलाठी, ग्रामसेवक, ग्राम समितींनी जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये उच्च, मध्यम, कनिष्ठ अशा तीन प्रतवारीच्या जमिनीमध्ये पीक परिस्थितीची पाहणी केल्यानुसार तहसीलदारांमार्फत खरीप पिकांची अंतिम पैसेवारीचा अहवाल १५ डिसेंबर २०२५ ला प्रशासनाने सरकारला पाठवला आहे..Kharif Crop Insurance: साडेचार लाख शेतकऱ्यांना खरीप पीकविमा परताव्याची प्रतीक्षा.या अहवालानुसार जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, वाशी, भूम, परंडा या आठही तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. यामध्ये जिल्ह्यात खरीप हंगामाची गावे ३५८ तर रब्बी हंगामाची गावे ३७५ आहेत. रब्बी हंगामातील बहुतांश गावामध्ये खरीप हंगामात पेरणी झालेली असल्यामुळे अशा गावांचा रब्बी हंगामातच पैसेवारीचा अहवाल सादर करण्यात आला आहे..Fruit Crop Insurance: विमा संरक्षित केळीची पडताळणी सुरू.जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांमध्ये पाणी साचून पिके वाया गेली. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादनापासून वंचित राहण्याची वेळ आली. शेतीपिकांचे झालेले नुकसान पाहता खरीप हंगामाची पैसेवारी किती येईल, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. आता अंतिम पैसेवारीचा अहवाल सरकारकडे पाठवला आहे. यामध्ये जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४६.०८ म्हणजे ५० पैशांपेक्षा कमी आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे..जिल्ह्यात ३७५ गावे रब्बीची आहेत. त्यात धाराशिव ६६, तुळजापूर ४०, उमरगा २१, लोहारा १०, कळंब १९, भूम ९०, वाशी २३, परंडा तालुक्यातील ९१ गावातील पेरा २/३ पेक्षा अधिक पेरणी खरीप हंगामात झालेली असल्यामुळे त्या गावांची पैसेवारी खरीप हंगामात जाहीर करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.