Kisan Sabha Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Kisan Sabha Protest : किसान सभेचा आक्रोश मोर्चा

Debt Relief Agitators : अखिल भारतीय किसान सभा, संयुक्त किसान मोर्चेने दिलेल्या राज्यव्यापी हाकेनुसार शेतकरी-कष्टकऱ्यांचा आक्रोश मोर्चा किनवट तहसील कार्यालयावर मंगळवारी धडकला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Team Agrowon

Nanded News : अखिल भारतीय किसान सभा, संयुक्त किसान मोर्चेने दिलेल्या राज्यव्यापी हाकेनुसार शेतकरी-कष्टकऱ्यांचा आक्रोश मोर्चा किनवट तहसील कार्यालयावर मंगळवारी धडकला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकरी-शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्ती करा, हमीभाव खरेदीचा केद्रींय कायदा करा, जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदान अद्यापपर्यंत वाटप करण्यात आले नसून, तातडीने अतिवृष्टी अनुदान वाटप करा,

स्मार्ट मीटर-वीज विधेयक प्रस्ताव रद्द करा, अग्रिम रक्कम वाटप करून शंभर टक्के पीकविमा मंजूर करा, निम्न पैनगंगा चिमटा धरण रद्द करा, कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा, वन, गायरान, देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करा,

सार्वजनिक राशन व्यवस्था मजबूत करून, शेतकऱ्‍यांचे धान्य बंद करून रोख रक्कम देण्याचे निर्णय रद्द करा, निराधारांना पेंशन, बेघरांना घर योजना लागू करा, सर्व कामगारांना किमान वेतन लागू करा आदी मागण्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या अनुषंगाने करण्यात आल्या.

आंदोलनात किसान सभेचे कॉ. जनार्दन काळे, कॉ. अडेलू बोनगीर, कॉ. सुनील राठोड, कॉ. तानाजी राठोड, कॉ. नंदकुमार मोदुकवार, कॉ. अंबर चव्हाण, कॉ. राम कंडले, कॉ. दिलीप जाधव, कॉ. जयवंत राठोड आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT