Kisan Sabha Protest : दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी किसान सभेचे आंदोलन

Demands of Drought Victim : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेतर्फे मंगळवारी (ता.२८) परभणी येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
Kisan Sabha
Kisan SabhaAgrowon

Parbhani News : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेतर्फे मंगळवारी (ता.२८) परभणी येथे धरणे आंदोलन करण्यात आले. देशव्यापी संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनानिमित्त किसान सभेतर्फे विविध मागण्या करण्यात आल्या.

त्यात परभणी जिल्ह्यातील टाकळी कुंभकर्ण, दूधगाव, वाघी धानोरा, मोरेगाव, ताडबोरगाव, रामपुरी, कासापुरी, शेळगाव, वडगाव, पिंपळदरी, पेठशिवणी रावराजूर, कावलगाव या १३ मंडलांचा दुष्काळग्रस्त महसूल मंडळांत तत्काळ समावेश करा.

Kisan Sabha
Kolhapur Drought : कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून मिळणार सवलती

सोमवारी (ता.२७) अतिवृष्टीमुळे झालेल्या झालेल्या पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून एनडीआरएफ नुसार मदत देण्यात यावेत, खरीप तूर, कापूस, रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी पिकांसाठी अग्रिम पीकविमा भरपाई द्यावी, गोदावरी नदीवरील ढालेगाव, तारुगव्हाण, मुदगल खडका, मुळी, दिग्रस बंधाऱ्यात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा,

Kisan Sabha
Rabi Crop In Crisis : पावसामुळे श्रीरामपूर परिसरातील तूर, हरभरा, गहू उत्पादक चिंतातूर

जायकवाडी प्रकल्पातून रब्बी पाणी पाळ्या वाढवून रब्बीमध्ये ४ व उन्हाळी हंगामात ४ पाणी पाळ्या द्याव्यात, पूर्णा पाटबंधारे प्रकल्पात पाणी असतानाही पाणी पाळ्या न दिल्याबद्दल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सिंचन कायद्यानुसार नुकसान भरपाई द्यावी, पीक रचनेनुसार रब्बी, उन्हाळी पाणी पाळ्या द्याव्यात,

दोषी अभियंत्यावर कारवाई करावी, मासोळी प्रकल्पातील सुरू असलेल्या औद्योगिक वापरावर निर्बंध आणा. ग्रामीण पाणीपुरवठा व गंगाखेड शहरास पाणीसाठा द्यावा, मुळी बंधाऱ्यावर दरवाजे बसवावेत आदी मागण्यांसाठी किसान सभेचे कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com