Onion Import Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Import : शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अफगानी कांदा थांबवा : किसान सभेची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Kisan Sabha On Afghanistan Onion : कांद्याच्या प्रश्नावरून राज्यातला शेतकरी रस्त्यावर उतरला. लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना कांद्याने दणका दिला. यानंतरही केंद्रातील भाजप सरकारने आपल्या धोरणात बदल केलेला नाही. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडण्याचे काम राज्य सरकार आणि केंद्र सरकार करत आहे. ४० टक्के निर्यातशुल्क, निर्यातबंदी, नाफेडचा भ्रष्टाचार यातून कांदा उत्पादक शेतकरी अद्यापही सावरला नाही. तोच पुन्हा एकदा सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. अमृतसर अन् दिल्लीच्या बाजरपेठेत अफगाणी कांदा उतरला आहे. तो राज्याच्या कांदा बाजार पेठेत येण्याची शक्यता आहे. यावरून किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच अफगाणी कांदा रोखण्यासाठी पंतप्रधानांनी आपली ५६ इंचाची छाती वापरावी असे म्हटले आहे. 

केंद्र आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या करारामुळे अमृतसर अन् दिल्लीच्या बाजरपेठेत अफगाणी कांदा उतरला आहे. अफगाणी कांद्याचे दर हे भारतीय कांद्यापैक्षा कमी असल्याचे त्याला उठाव अधिक आहे. सध्या भारतात कांद्याचे दर ४० ते ५० रुपये किलो असून अफगाणिस्तानचा कांदा , २८ ते ३० रुपये किलो भावाने मिळत आहे. यामुळे दिल्लीतील खासगी व्यापाऱ्यांकडून थेट अफगाणिस्तानहून पाकिस्तानमार्गे कांदा भारतात आणला जात आहे. तसेच भारताच्या कांद्याच्या मानाने अफगाणी कांदा परवडणारा असल्याने तो कांदा व्यापाऱ्यांना परवडणारा आहे. 

तर सध्या अमृतसर अन् दिल्लीच्या बााजरपेठेत असणारा कांदा नाशिकसह इतर ठिकाणच्या बाजार पेठेत उतरण्याची शक्यता आहे. तर यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. यामुळे नाशिकसह इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानच्या कांद्याला परवानगी देऊ नये, अशी मागणी राज्य सरकारसह केंद्राकडे केली आहे. 

यावरून किसान सभेने केंद्राकडे सलग तीन सिझन कांदा उत्पादक शेतकरी नुकसान सहन करत आहेत. त्यातच केंद्राचे निर्यात धोरणासह अटी व शर्तींमुळे कांद्याचे भाव सतत पडत आहेत. त्यामुळेच राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला होता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपली नाराजी लोकसभेवेळी मतदानातून व्यक्त केली होती. 

एकीकडे कांदा उत्पकांमध्ये अद्याप नाराजी असतानाही दुसरीकडे केंद्राचे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. केंद्राने केलेल्या करारामुळे अफगाणी कांदा पाकिस्तानमार्गे भारतात येत आहे. तसेच तो अधिक स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने कांदा उत्पादक पुन्हा एकदा अडचणीत येणार आहे. कांदा उत्पादकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असल्याचे नवले म्हणाले. 

तर शेतकऱ्यांना मातीत घालणारे करार का होतात असा सवाल नवले यांनी उपस्थित केला आहे. तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात न घेता केंद्राकडून करार करण्यात यावेत अशी मागणी नवले यांनी केली आहे. तर सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत न पाहता अफगाणी कांदा रोखा. तर पंतप्रधान मोदींनी त्यांची छप्पन इंचची छाती अशी वेळी पुढे करावी अशी टीका नवले यांनी केली आहे. तसेच शेतकरी विरोधी सर्व धोरणे थांबवत कांदा उत्पादकांचे हित लक्षात घेत कांदा निर्यात करा अशीही मागणी नवले यांनी केली आहे.  

दोन देशांमध्ये झालेल्या व्यापारी करारामुळे अफगाणिस्तानचा २०० टन कांदा भारतात दाखल झाला आहे. ४० टनाप्रमाणे पाच ट्रकमधून २०० टन कांदा दिल्लीसह अमृतसरमधील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाला आहे. तर पाकिस्तानमार्गे वाघा बॉर्डर पास करून कांदा भारतात दाखल असून तो थेट ग्राहकांना २६ ते ३२ रुपये किलो भावाने दिला जात आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT