Nashik News : जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांच्या आवारामध्ये कांद्याच्या आवकेत चढ-उतार सुरू आहेत. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा मर्यादित असल्याने सध्या कांद्याला प्रतिक्विंटल २,८०० ते २,९०० रुपये दर मिळत आहेत. आवक काहीशी नियंत्रित असल्याने दर टिकून आहेत.
दुष्काळी परिस्थिती व तापमान वाढ असताना लागवडी झाल्या. काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी त्या सोडून दिल्या. त्यामुळे यंदा कांद्याचे उत्पादन काहीसे कमी आहे. त्यात उत्पादित कांदा चाळीत साठविला. मात्र वातावरणीय बदलांमुळे साठवणूक केलेल्या कांद्याचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकरी गरजेनुसार टप्प्याटप्प्याने विक्री करीत आहेत.
मार्चअखेर कांद्याची काढणी सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात येण्यास सुरवात झाली. एप्रिलमध्ये लेव्हीच्या मुद्द्यावर लिलाव बंद होते. अखेर बाजार समित्यांनी स्थानिक पातळीवर तोडगा काढून मे महिन्यात कामकाज सुरू केले. त्यावेळी दरात सुधारणा दिसून आली.
जूनमध्ये आवक मर्यादित असताना मागीलवर्षी प्रमाणे दर मिळत आहेत. शेतकऱ्यांचा अजूनही काही प्रमाणात तोटा होत आहे. त्यामुळे निर्यातदार व व्यापाऱ्यांमार्फत अद्यापही कांद्याच्या निर्यातीला काही अंशी ब्रेक लागला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आवक पिंपळगाव बाजार समितीत होत आहे.
स्थिर दरामागील कारणे...
- कांदा टिकवून ठेवला
- मागणीच्या तुलनेत मर्यादित आवक व काही प्रमाणात निर्यात
- राजस्थान व मध्यप्रदेशमधील कांदा उपलब्धता तुलनेत कमी
- दक्षिण भारतातील नवीन खरीप कांदा दीड महिन्याने बाजारात येणार
प्रमुख कांदादराची स्थिती :(ता. १२ जून)
बाजार आवार...क्विंटल...किमान...कमाल...सरासरी
लासलगाव...५८८०...१०१२...३०८६...२९००
विंचूर-लासलगाव...६५००...१०००...३२०१...२९००
पिंपळगाव बसवंत...१३५००..१०००...३२००...२८००
देवळा...६२५०...१३००...३३००...२९५०
येवला...४५००...७००...२८७१...२६५०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.