Kisan Drone Agrowon
ॲग्रो विशेष

Kisan Drone : दररोज पंचवीस एकर फवारणी करणारा ‘किसान ड्रोन’

Agriculture Drone : फवारणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा ‘किसान ड्रोन’ शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

Team Agrowon

Sangli News : फवारणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा ‘किसान ड्रोन’ शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. ‘जीइएनपीएस सोल्युशन्स’ कंपनीचा डीजीसीए मान्यता प्राप्त ड्रोन आहेत.

अग्रोन-x, अग्रोन-x अॅडव्हान, अग्रोन-x प्रो असे तीन प्रकारचे किसान ड्रोन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहेत. फळबाग, ऊस, मका, यासह कडधान्ये, तूर आदी पिकांच्या फवारणीसाठी उपयुक्त ठरला आहे, असा दावा किसान ड्रोनचे वितरक सौरभ घेवारी, विक्रेत विक्रम पानसरे यांनी केला.

त्यांनी सांगितले, की गेल्या चार ते पाच वर्षांपासून कीडनाशक फवारणीसाठी किसान ड्रोन ही कंपनी कार्यरत आहे. या ड्रोनची फ्रेम पूर्णतः भारतीय निर्मितीची आहे. अग्रोन-x, अग्रोन-x अॅडव्हान, अग्रोन-x प्रो असे तीन प्रकार आहेत.

त्यापैकी अग्रोन-x अॅडव्हान, अग्रोन-x प्रोमध्ये विविध फिचर आहेत. डीजीसीए भारत सरकारने या ड्रोनला मान्यता दिली आहे. गेल्या सहा-सात महिन्यांत राज्यात १२ हून अधिक ड्रोन शेतकऱ्यांनी खरेदी केले आहेत.

प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकरी ड्रोनने फवारणी करण्यासाठी पसंती देत आहेत. एका बॅटरीची क्षमता चार एकरावर फवारणी इतकी आहे. प्रतिदिन कमाल २५ एकरावर फवारणी करण्याची क्षमता या ड्रोनची आहे. ड्रोन चालवण्यासाठी पालयट प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT