Team Agrowon
किडनाशकाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ड्रोन चा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
ड्रोन चालविणे हे मोठे कौशल्याचे काम असून, डीजीसीएच्या धोरणानुसार ड्रोनचा वापर करण्यासाठी ड्रोन पायलट परवाना हा सक्तीचा आहे. त्यासाठी विद्यापीठामध्ये प्रशिक्षण उपलब्ध असून, त्याद्वारे कुशल मनुष्यबळ तयार केले जात आहे.
पायलटला ड्रोन संचालनाबरोबरच कीडनाशके किंवा रसायनाच्या सुरक्षित वापरासंबंधिचे प्रशिक्षण अत्यावश्यक असते.
कामापूर्वी आठ तास आधीपर्यंत कोणत्याही मादक द्रव्याचे सेवन केलेले नसावे.
ड्रोन उड्डाणापूर्वी त्याच्या सर्व यंत्रणा आणि फवारणी यंत्रणा योग्य प्रकारे समायोजित (कॅलिब्रेट) केल्याची आणि यंत्रणेतून गळती होत नसल्याची खात्री करणे आवश्यक.
ड्रोन चालविण्यापूर्वी परिसरातील संबंधित सार्वजनिक संस्था उदा. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि कृषी अधिकारी यांना २४ तास अगोदर लेखी सूचना देणे आवश्यक.
फवारणी क्षेत्रांमध्ये माणसे व पाळीव जनावरे ठरावीक काळापर्यंत येणार नाहीत, याची खात्री करण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्याची असेल.