Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : ‘दक्षता’चे उपसंचालकपद अखेर किरण जाधव यांच्याकडे

Latest Agriculture News : कृषी खात्यातील दक्षता पथकाच्या उपसंचालकपदासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शर्यतीत किरण जाधव यांनी बाजी मारली आहे.

मनोज कापडे

Pune News : कृषी खात्यातील दक्षता पथकाच्या उपसंचालकपदासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शर्यतीत किरण जाधव यांनी बाजी मारली आहे. राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण क्षेत्रातील सखोल माहिती असलेला अधिकारी म्हणून किरण जाधव यांनी लौकिक मिळवला होता.

गुणनियंत्रणच्या कामकाजात निविष्ठा कंपन्या व प्रशासनात समन्वय ठेवण्याचे उत्तम काम ते करीत होते. त्यांची बदली होऊ नये म्हणून काही कंपन्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र या पदावरील त्यांची मुदत गेल्या वर्षी संपुष्टात आली.

त्यामुळे इतर अधिकाऱ्यांनी जाधव यांच्या बदलीसाठी जोरदार व्यूहरचना केली होती. दुसऱ्या बाजूला त्यांच्या बदलीचा प्रस्ताव रोखण्यासाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत ‘लॉबिंग’ झाले होते. या गोंधळात श्री. जाधव यांच्या हातून गुणनियंत्रण विभाग सुटला व त्यांची जागा रामचंद्र धायगुडे यांनी प्राप्त केली.

राज्य शासनाने श्री. जाधव यांची बदली ‘गुणनियंत्रण’ मधून मृदसंधारण विभागात केली. परंतु त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी काही कंपन्यांनी पुन्हा पुढाकार घेतल्याचे बोलले जात होते. त्यांना पदोन्नती देणे व कृषी आयुक्तालयातील थेट दक्षता पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्याच्या हालचाली गेल्या काही महिन्यांपासून सुरू होत्या.

दुसऱ्या बाजूला, दक्षता पथकाचे उपसंचालकपद मिळवण्यासाठी सुधीर नाईनवाड, संजय गुंजाळ तसेच इतर काही अधिकाऱ्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली. त्यामुळे या पदासाठी मंत्रालयात चांगलीच स्पर्धा रंगली. या स्पर्धेत अखेर श्री. जाधव यांनी बाजी मारली.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, श्री. जाधव यांना आता केवळ ‘गुणनियंत्रण’च नव्हे; तर राज्यातील कोणत्याही कृषी योजना किंवा प्रकल्पाच्या प्रशासकीय किंवा तांत्रिक कामाची चौकशी करण्याचे अधिकार मिळणार आहेत.

कृषी आयुक्तांच्या कक्षेत थेट दक्षता पथक येत असल्यामुळे पथकाच्या चौकशीत कोणालाही अडथळा आणता येत नाही. जाधव यांच्याकडून पूर्वी ‘गुणनियंत्रण’मधील शोधमोहिमा, धाडसत्रे आता ‘दक्षता’च्या माध्यमातून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुणनियंत्रण, मृद्‍संधारण व निविष्ठांशी संबंधित लॉबीचे धाबे दणाणले आहे.

‘ठिबक’चे नवे प्रमुख संजय गुंजाळ?

मृदसंधारण विभागात कार्यरत असलेले व अलीकडेच पदोन्नतीच्या प्रक्रियेत असलेले संजय गुंजाळ यांना राज्याच्या ठिबक विभागाचे प्रमुखपद मिळण्याची शक्यता आहे. या पदावर सध्या उपसंचालक रामचंद्र फडतरे कार्यरत आहेत. ते लवकरच निवृत्त होत असून त्यानंतर श्री. गुंजाळ यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे, अशी माहिती आस्थापना विभागाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT