Agriculture Department : कृषी विभागासाठी सव्वा कोटींची तरतूद

Agriculture Funds : कोल्हापुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीव्हीसी पाइप पुरवठा करणे व स्लरी युनिट पुरवठा करणे यांचा समावेश आहे. ३० लाखांची तरतूद केली आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Sangli News : कृषी विभागासाठी एक कोटी २५ लाख २६ हजारांची तरतूद केली असून दोन नवीन योजना अंदाजपत्रकात प्रस्तावित केल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीव्हीसी पाइप पुरवठा करणे व स्लरी युनिट पुरवठा करणे यांचा समावेश आहे. ३० लाखांची तरतूद केली आहे. चापकटरची मागणी लक्षात घेऊन ५५ लाखांची तरतूद केली आहे.

जिल्हा परिषदेचे सन २०२४-२५ चे ५० कोटी २९ लाख २७ हजार ८८६ रुपयांचे मूळ, तर ३६ हजार ७१७ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना सादर करण्यात आले.

सन २०२३-२४ चे १३६ कोटी ८१ हजार ६२३ रुपयांचे अंतिम सुधारित अंदाजपत्रक सादर करण्यात आले. गत वर्षीचे मूळ अंदाजपत्रक ६६.१४ कोटींचे होते. चालू वर्षी सुमारे १६ कोटींच्या तरतुदी कमी करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे विकासकामांना कात्री लागली आहे. जिल्हा परिषदेचे विविध करापोटी ५१ कोटी ७१ लाख रुपये शासनाकडे थकीत आहेत. ते मिळाल्यानंतर प्रथम सुधारित अंदाजपत्रकात विकास कामांच्या तरतुदी वाढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Agriculture Department
Agriculture Department : ‘कृषी’ने काढले २४ शासकीय आदेश

यंदाच्या मूळ अंदाजपत्रकात दोन कोटी दोन लाख ५५ हजारांची तरतूद अध्यक्ष, उपाध्यक्ष मानधन, प्रवास भत्ता व अनुषंगिक खर्चासाठी केली आहे. ई-गव्हर्नन्स हे लेखाशीर्ष नव्याने निर्माण केले असून आहे.

ग्रामपंचायत विभागासाठी चार कोटी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्क हिस्सा ही प्रमुख बाब असून त्या अंतर्गत २ कोटी ५० लाखांची तरतूद आहे.

Agriculture Department
Agriculture Department Staffing : कृषी विभागात प्रभारीराज

शिक्षण विभागासाठी एक कोटी ५६ लाख ७९ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. जीवनकौशल्याचा विकास आणि तत्सम शैक्षणिक कार्यक्रमासाठी १५ लाख, हॅपीनेस प्रोग्रॅमसाठी पाच लाखांची तरतूद आहे.

समाज कल्याण विभागासाठी मुलींना सायकलीसाठी अर्थसाहाय्य देण्याची नवीन योजना समाविष्ट करण्यात आली असून ७ लाख ७९ हजार रुपयांची तरतूद आहे. निवृत्तिवेतन व संकीर्णमध्ये ७ कोटी १३ लाख २४ हजारांची तरतूद करण्यात आली आहे.

विभागनिहाय तरतुदी

ग्रामपंचायत - ४.२५ कोटी, शिक्षण - १.५७ कोटी, बांधकाम - ४.८८ कोटी, लहान पाटबंधारे - २६ लाख, आरोग्य विभाग - २.४१ कोटी, पाणी पुरवठा व स्वच्छता - ८१.२१ लाख, कृषी - १.२५ कोटी, पशुसंवर्धन - ६३.५० लाख, समाज कल्याण - १.७३ कोटी, महिला व बालकल्याण - ३६.६५ लाख, अपारंपरिक ऊर्जा विकास - ५० लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com