Khola Chilli Agrowon
ॲग्रो विशेष

Khola Chilli : गोव्याची खोला मिरची फक्त कानाकोना भागातीलच शेतकऱ्यांना पिकवता येणार, पहिले शेतकरी पीक म्हणून आसीयएआरची मान्यता

Goa’s First Farmer Plant : केंद्र सरकारच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेने खोला मिरचीला अधिकृत मान्यता दिली आहे. तसेच गोव्यातील पहिले शेतकरी पीक म्हणून देखील खोला मिरचीची नोंद करण्यात आली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्र सरकारच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) गोव्यातील खोला मिरचीला शेतकरी पीक म्हणून मान्यता दिली आहे. तसेच परिषदेने खोला मिरचीचे पीक कानाकोनाच्या भौगोलिक परिसरातील शेतकऱ्यांचे पीक असल्याची अधिकृत घोषणा देखील केली आहे. त्यामुळे खोला मिरची गोव्यातील नोंदणीकृत पहिले शेतकरी पीक ठरले आहे.

खोला मिरचीला ज्याला कानाकोना मिरची म्हणून म्हणूनही ओळखले जाते. खोला (कोला) गावातील आदिवासी समुदायांद्वारे पारंपारिकपणे खोला मिरचीची शेती केली जाते. याची लागवड पद्धत विशिष्ट विशिष्ट असून ती पावसाळ्यात लागवड केली जाते. तर याची शेती कानाकोनाच्या डोंगराळ प्रदेशात आणि खडकाळ मैदानात केली जाते. त्यामुळे कानाकोना येथील शेतकरीच हा खोला मिरचीचा खरा उत्पादक असल्याचेही परिषदेने म्हटले आहे.

दरम्यान दोन वर्षांपूर्वीच खोला मिरचीला भौगोलिक मानांकन (GI) प्राप्त झाले होते. त्यामुळे यापुढे खोलाच्या शेतकऱ्याशिवाय अन्य कोणासही खोला मिरचीचे व्यावसायिक उत्पादन घेता येणार नाही. राज्यात उत्पादन घेता येईल मात्र खोला मिरचीला मिळालेले भौगोलिक मानांकन वापरता येणार नाही. तसेच येथील समूहाकडे आता उत्पादन, विक्री, बाजार, वितरण, आयात आणि निर्यातीचे विशेष अधिकार राहणार आहेत. प्राधिकरणानुसार हा कालावधी सहा वर्षांसाठी असून २०३९ पर्यंत नूतनीकरण करता येणार आहे.

खोला मिरचीच्या जातीचे संकलन, वैशिष्ट्यीकरण भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सेंट्रल कोस्टल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, गोवा यांनी केले आहे. तर वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणास अहवाल दिला होता. त्यानंतर आता खोला मिरचीची गोव्यातील नोंदणीकृत पहिले शेतकरी पीक म्हणून यशस्वी नोंद झाली आहे. खोला मिरची तिच्या लाल रंगासाठी आणि मध्यम तिखटपणासाठी प्रसिद्ध आहे.

याआधी आयसीएआर परिषदेच्या जुने गोवे येथील केंद्रातून डॉ. ए. आर. देसाई यांनी खोला मिरचीवर काम केले होते. तसेच त्यांनी ‘कार्दोज मानकुराद’ या आंब्यालाही अशीच भौगोलिक मानांकन मिळावे, यासाठीही काम केले आहे. मात्र, अद्याप ती मान्यता मिळालेली नाही.

केंद्र सरकारच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेने खोला मिरचीबाबत निर्णय चांगला घेतला आहे. यामुळे आता गोव्यातील कानाकोना भागासह इतर ठिकाणी खोला मिरचीचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. सध्या घेतलेल्या निर्णयामुळे फक्त कानाकोना भागातीलच शेतकऱ्यांना खोला मिरचीच्या उत्पादनावर भौगोलिक मानांकन वापरता येईल. येथील शेतकऱ्यांनाच उत्पादन, विक्री, बाजार, वितरण, आयात आणि निर्यातीसाठी भौगोलिक मानांकनाचा वापर करता येईल. पण यामुळे कोणाला उत्पादन घेता येणार नाही असे नाही. फक्त भौगोलिक मानांकनाचा वापर करता येणार नाही.
-दिपक परब, नोडल अधिकारी (भौगोलिक मानांकन), सेंट्रल कोस्टल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, गोवा
खोला मिरचीचे पारंपरिकपणे शेतकरी उत्पादन घेतात. अनेकजण वनस्पतींचा वापर करून पारंपरिकरित्या औषधोपचारही करतात. पूर्वीच्या काळी हे ज्ञान मोफत दिले जायचे. आता ते दिवस राहिलेले नाहीत. पारंपरिक ज्ञानाची चोरी होते, त्यामुळेच स्वामीत्वधन मागितले जाते. ते आता खोला मिरचीला मिळाले आहे.
-डॉ. प्रवीण कुमार. तटीय राज्ये कृषी संशोधन केंद्राचे संचालक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mukhyamantri Sahayata Nidhi: मुख्यमंत्री साह्यतामधून नाशिक विभागात ३५४२ रुग्णांना साडेबत्तीस कोटींची मदत  

Crop Insurance: अमरावती जिल्ह्यात केवळ २३ टक्के क्षेत्र विमासंरक्षित

Farmer Scam: कर्मचाऱ्याने लाभार्थ्यांचे २३ लाख लुबाडले

SMART Project: ‘स्मार्ट’अंतर्गत १६ ‘एफपीओं’ना १०.५३ कोटींचे अनुदान वितरित

Nanded Weather: नांदेडसाठी पुन्हा ‘येलो अलर्ट’ जारी

SCROLL FOR NEXT