Mahesh Gaikwad
हवामानाशी जुळवून घेणाऱ्या जैवसंवर्धनयुक्त १०९ पीक वाणांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
भारतीय कृषी संशोधन परिषदेने ६१ पिकांचे १०९ वाण विकसित केले आहेत. राष्ट्रीय डाळिंब केंद्राने विकसित केलेल्या 'सोलापूर अनारदाना' या डाळिंबाच्या वाणाचाही यात समावेश आहे.
कडधान्ये, भरडधान्ये, कंदवर्गिय, ऊस, कापूस यासह विविध भाजीपाल आणि अन्य पिकांचे वाण आयसीएआरने विकसित केले आहेत.
हे वाण हवामानाशी जुळवून घेणारे असून अधिक उत्पादन देणारे आहेत. शिवाय ते जैवसंवर्धनयुक्त आहेत.
६१ पिकांपैकी ३४ शेतवर्गीय पिके असून २७ फलोद्योग श्रेणीतील पिके आहेत. लोकार्पणाच्या कार्यक्रमानंतर मोदी यांनी कृषी शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
विविध पिकांच्या या वाणांमुळे शेतीचा खर्च कमी होण्यासह पर्यावरण संवर्धन देखील होईल, असे मोदी यावेळी म्हणाले.
पौष्टिक आणि जैविक खाद्य विकल्पाच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मोदी यांनी नमूद केले.