Kharif Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : जूनमधील असमतोल पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये अडथळे

Rain Update : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत जून महिन्यात यंदाही असमतोल स्वरूपाचा पाऊस झाला.

Team Agrowon

Akola News : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत जून महिन्यात यंदाही असमतोल स्वरूपाचा पाऊस झाला. काही मंडलांनी सरासरी गाठली तर काही मंडले कोरडेच आहे. तेथे ५० टक्केच पाऊस झाल्याचे समोर आले. काही भागात कमी पावसामुळे उगवण कमी झाली, दुबार पेरणीचेही संकट उभे ठाकले.

अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात १२४ मिलिमीटर पाऊस झाला. या तालुक्यात जूनमध्ये साधारण पाऊस हा किमान १३० मिलिमीटर अपेक्षित राहतो. ५ टक्के कमी पाऊस झाला. अकोल्यात १५ टक्के तूट आहे. बार्शीटाकळीत १० टक्के आणि मूर्तिजापूरमध्येही ४ टक्के तूट निर्माण झाली. बुलडाणा जिल्ह्यात मेहकर हा तालुका यंदा पिछाडीवर पडला आहे.

येथे जून महिन्यात १५१ मिलिमीटर पाऊस झाला. हा पाऊस सरासरी १६४ मिलिमीटरच्या तुलनेत ९२.४ टक्के एवढा आहे. जियापैकी काही तालुक्यांमध्ये मंडलांमध्ये मोठी तूट आहे. सोनाळा मंडलात ११८ मिलिमीटर म्हणजेच १२५.६ च्या तुलनेत ९३ टक्केच पाऊस झाला. कवठळ मंडलात ९०.२ टक्के (११३.३ मिली), चिखली तालुक्यात चिखली मंडल ९२.७, कोलारा ९०.५, मेरा खुर्द ६२.५, उंद्री ८९.६, पेठ ८४.२, शेलगाव आटोळ ८३.३, चांदई ८३.९ टक्के पाऊस पडला.

बुलडाणा मंडलात १८४.७ च्या तुलनेत १४२.२ मिली (७७ टक्के) पाऊस नोंद झालेली आहे. देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा मंडलात जूनमध्ये १४० मिली पाऊस अपेक्षित असतो. तुलनेत ८८.२ (६२.७ टक्के) मिली पाऊस झाला. मेहकर तालुक्यात जानेफळ मंडलात १६४.४ मिली अपेक्षित पावसाच्या तुलनेत १३६.९ (८३.३ टक्के) मिली, हिवरा आश्रम १०७.९ (६५.६ टक्के), शेलगाव देशमुख ११७.७ (७१.६ टक्के) मिली, देऊळगाव माळी मंडलात १६४.४ मिलीच्या तुलनेत ८८.५ मिली (५३.८ टक्के) पाऊस झाला.

जिल्हयात सर्वात कमी पाऊस या मंडलात जूनमध्ये झाला आहे. फक्त ६ दिवसच या मंडलात पावसाची नोंद आहे. वरवंड मंडलात १४२.६ मिली (८६.७ टक्के), अंजनी बुद्रूक १४४.९ मिली (८८.१ टक्के), लोणी १६२.४ मिली (९८.८ टक्के), कल्याण १३२.१ मिली (८०.४ टक्के), खामगाव तालुक्यात पळशी बुद्रुक मंडलात ८६.८ मिली (७४.४ टक्के), अडगाव ८५.८ (७३.६ टक्के),नांदुरा मंडलात ७४.५ मिली (६२.९) पाऊस झाला.

वाशीम जिल्ह्यातही असमतोल स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. वाशीम मंडलात १५२.३ मिली (७४.५ टक्के) पाऊस पडला. राजगाव १५६.९ मिली (७६.८ टक्के), नागठाणा १७०.९ (८३.७ टक्के), केकतउमरा १४६(७१.५ टक्के), कोंढाळा झांबरे १६३.१ (७९.८ टक्के), रिसोड १२७.३ (७६.८ टक्के), मोप १५६ (९४.१ टक्के) ९०.८ टक्के पाऊस पडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT