Kharif Sowing : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये ८० टक्के पेरणी

Kharif Season : छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण २० लाख ९० हजार १९८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १६ लाख ६० हजार २९४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गतच्या छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण २० लाख ९० हजार १९८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १६ लाख ६० हजार २९४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. २७ जूनअखेर झालेल्या या पेरणीचा टक्का सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७९.४३ टक्के इतका आहे.

तीनही जिल्ह्यांत कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १० लाख ५९ हजार ३२४ हेक्टर आहे. प्रत्यक्षात ७ लाख ९० हजार ८७७ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत टक्के ७४.६६ लागवड आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७८ हजार ८२४ हेक्टर आहे. प्रत्यक्षात ४ लाख ४९ हजार ७४ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ११८ टक्के पेरणी झाली.

Kharif Sowing
Agriculture Sowing : जळगाव जिल्ह्यात ५४ टक्के पेरण्या

छत्रपती संभाजीनगरला २७ जून अखेरपर्यंत जिल्ह्यात १९३.१० मिलिमीटर म्हणजे वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३०.२९ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील ४० मंडलांत अतिवृष्टी झाली. जालना जिल्ह्यात १८८.४० मिलिमीटर म्हणजे वार्षिक सरासरीच्या २८.४१ टक्के, बीड जिल्ह्यात १७९.७० मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत २८.१३ टक्के पाऊस झाल.

सर्वात कमी पाऊस वडवणी तालुक्यात १२० मिलिमीटर, तर सर्वात जास्त शिरूर कासार तालुक्यात २१५.४० मिलिमीटर झाला. कडा, दौलावडगाव, जातेगाव, धोंडराई, अंबाजोगाई, घाटनांदूर, धर्मापुरी, मोहखेड व माजलगाव या नऊ मंडलांत अतिवृष्टी झाली.

Kharif Sowing
Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात ५० टक्केच पेरणी

कृषी विभागाच्या अहवालानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रस्तावित ६ लाख ८४ हजार ७१६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात ५ लाख ६२ हजार ६६६ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८२.१८ टक्के पेरणी झाली. जालना जिल्ह्यात सर्वसाधारण ६ लाख १९ हजार ६९५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४ लाख ८३ हजार ६४५ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७८.५ टक्के पेरणी झाली. बीड जिल्ह्यात सर्वसाधारण ७ लाख ८५ हजार ७८६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात ६ लाख १३ हजार ९८३ हेक्टर पेरणी झाली आहे.

जिल्हानिहाय कपाशी लागवड, सोयाबीन पेरणी (हेक्टर)

जिल्हा कपाशी सोयाबीन

छत्रपती संभाजीनगर ३०८४७३ २१८३४

जालना २४९५१८ १४७३५२

बीड २३२८८६ २७९८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com