Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात गेल्या २० ते २५ दिवसांत पेरण्या योग्य पाऊस झाला नव्हता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या ५४.८३ टक्के पूर्ण केल्या आहेत. गुरुवारी (ता. २७) व शुक्रवारी (ता. २८) शहरासह जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली. यामुळे अनेक भागांसह शेतातील खोलगट भागात पाणी साचले होते.
२२ जूनपर्यंत पावसाने ओढ दिली होती. मात्र, गेल्या रविवारी (ता. २३) जिल्ह्यात कोठेना कोठे पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. उर्वरित पेरण्याही लवकर पूर्ण होतील, अशी आशा आहे.
जूनमध्ये मॉन्सूनने हवी तशी हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांमध्ये खरिपाबाबत चिंतेचा सूर होता. पाऊस पडण्यासाठी ढगही येतात, जमा होतात. मात्र, काही वेळाने ढग पाऊस पाडण्याविनाच निघून जातात, असा खेळ जिल्ह्यात सुरू होता. पाऊस पडण्यासाठी हवी तशी घनता ढगांसाठी तयार होत नव्हती. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांत ढगही येतात आणी पाऊसही पडत आहे. मात्र, त्याचा जोर कमी अधिक प्रमाणात आहे.
चार लाख हेक्टवर पेरण्या
जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ७ लाख ६९ हजार ६०१ हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख २२ हजार २०३ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक पेरा कापसाचा झाला आहे. कापसाचे क्षेत्र ५ लाख १ हजार ५१६ हेक्टर होते. त्यापैकी ३ लाख ४० हजार ८४१ हेक्टरवर (६९.९६ टक्के) पेरण्या झाल्या आहेत.
आतापर्यंत झालेल्या पेरण्या अशा (हेक्टरमध्ये)
पीक अपेक्षित
क्षेत्र प्रत्यक्षात झालेली पेरणी
कापूस ५०१५६१ ३४०८४१
सोयाबीन २९६३५ ३७२९
ज्वारी ४४७३३ ३०७५
बाजरी १५७७४ २८६७
मका ९८०२५ ५५५३६
तृणधान्य २१३७ १७७५
तूर १६५०३ ६१२८
मूग २८०९६ ४२४०
उडीद २६३१२ ३२५२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.