Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crops : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत २० लाख हेक्टरवर खरीप पिके

Kharif Sowing Update : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील खरिपाच्या सर्वसाधारण वीस लाख ९० हजार १९८ हेक्टर क्षेत्रापैकी २० लाख ८४ हजार ४२५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील खरिपाच्या सर्वसाधारण वीस लाख ९० हजार १९८ हेक्टर क्षेत्रापैकी २० लाख ८४ हजार ४२५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९९.७२ टक्के आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यांतील पावसाची वार्षिक सरासरी ६४६.५३ मिलिमीटर असून महावेधनुसार ८ ऑगस्ट अखेरपर्यंत ४०४.५० मिलिमीटर पाऊस झाला. जो वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत ६२.५६ टक्के आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६३७.५० मिलिमीटर पावसाच्या तुलनेत ३८७.२० मिलिमीटर पाऊस झाला. जालना जिल्ह्यात ६६३.२० मिलिमीटर सरासरी पावसाच्या तुलनेत ४१४.३० मिलिमीटर पाऊस झाला.

तर बीड जिल्ह्यात सरासरी ६३८.९० मिलिमीटर पावसाच्या तुलनेत ४१२ मिलिमीटर पाऊस झाला. तीनही जिल्ह्यातील हवामान ढगाळ राहिले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त ५० मंडलांत आजवरच्या पावसाळ्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

कमी पावसाचे प्रमाण पावसातील लहरीपणा यामुळे अनेक भागात रखडत तर काही ठिकाणी दुबार-तिबार झालेल्या पेरणीमुळे अजूनही सर्वसाधारण क्षेत्र इतकी पेरणी झाली नसल्याचे कृषी विभागाचे अहवालावरून स्पष्ट होते. पेरणी झालेली सर्वच पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राइतकी पेरणी झाली नसून जालना जिल्ह्यात मात्र सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत किंचित पुढे जाऊन पेरणी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT