Kharif Crops : तीन जिल्ह्यांत २० लाख हेक्टरवर खरीप पिके

Kharif Season : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील खरिपाच्या सर्वसाधारण वीस लाख ९० हजार १९८ हेक्टर क्षेत्रापैकी २० लाख ८४ हजार ४२५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील खरिपाच्या सर्वसाधारण वीस लाख ९० हजार १९८ हेक्टर क्षेत्रापैकी २० लाख ८४ हजार ४२५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९९.७२ टक्के आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यांतील पावसाची वार्षिक सरासरी ६४६.५३ मिलिमीटर असून महावेधनुसार ८ ऑगस्ट अखेरपर्यंत ४०४.५० मिलिमीटर पाऊस झाला. जो वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत ६२.५६ टक्के आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६३७.५० मिलिमीटर पावसाच्या तुलनेत ३८७.२० मिलिमीटर पाऊस झाला.

Kharif Season
BBF Sowing : अतिवृष्टीतही वाचली ४० हजार हेक्‍टरवरील पिके

जालना जिल्ह्यात ६६३.२० मिलिमीटर सरासरी पावसाच्या तुलनेत ४१४.३० मिलिमीटर पाऊस झाला. तर बीड जिल्ह्यात सरासरी ६३८.९० मिलिमीटर पावसाच्या तुलनेत ४१२ मिलिमीटर पाऊस झाला. तीनही जिल्ह्यातील हवामान ढगाळ राहिले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त ५० मंडलांत आजवरच्या पावसाळ्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

कमी पावसाचे प्रमाण पावसातील लहरीपणा यामुळे अनेक भागात रखडत तर काही ठिकाणी दुबार-तिबार झालेल्या पेरणीमुळे अजूनही सर्वसाधारण क्षेत्र इतकी पेरणी झाली नसल्याचे कृषी विभागाचे अहवालावरून स्पष्ट होते. पेरणी झालेली सर्वच पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. ढगाळ अर्थात पोषक वातावरणामुळे पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राइतकी पेरणी झाली नसून जालना जिल्ह्यात मात्र सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत किंचित पुढे जाऊन खरिपाची पेरणी झाली आहे.

Kharif Season
Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात खरिपाचा पेरा अंतिम टप्प्याकडे

जिल्हानिहाय पेरणी स्थिती

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र सहा लाख ८४ हजार ७१६ हेक्टर असून त्यापैकी सहा लाख ७४ हजार ९४५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. या पेरणीत शेतकऱ्यांनी कपाशी, मका, बाजरी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सोयाबीन आदी पिकांच्या पेरणीला प्राधान्य दिले आहे.

जालना : जिल्ह्याचे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख १९ हजार ६९५ हेक्टर आहे. त्या तुलनेत ६ लाख २५ हजार ९७० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. पेरणीत शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, तुर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ पिकाच्या पेरणीला प्राधान्य दिले आहे.

बीड : जिल्ह्याचे खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र ७ लाख ८५ हजार ७८६ हेक्टर आहे. त्या तुलनेत ७ लाख ८३ हजार ५१० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. पेरणीत शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, उडीद, बाजरी, तूर, मका, ज्वारी, मूग, भुईमूग आदी पिकाच्या पेरणीला प्राधान्य दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com