Crop Competition  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Competition : तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये पीक स्पर्धेत सहभागी व्हावे ः चव्हाण

Crop Competition । तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये पीक स्पर्धेत सहभागी व्हावे ः चव्हाण । Kharif Crop Competition 2025 Announced in Maharashtra with Huge Rewards! mj18

Team Agrowon

Parbhani News : राज्यांतर्गत तृणधान्ये, कडधान्ये व गळीतधान्ये पिकांच्या पीक स्पर्धा खरीप हंगाम २०२५साठी आयोजित करण्यात आल्या आहेत. पिकस्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे.

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

पीक स्पर्धेतील पिके

खरीप पिकात ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन या सहा पिकांचा समावेश आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे अवश्य आहे. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन.७/१२, ८-अ उतारा. जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास). शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा. बँक खाते चेक,पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत.

अर्ज करण्याची मुदत..

खरीप हंगामामध्ये पिकस्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख पुढील प्रमाणे राहील. मूग, उडीद पिकासाठी ३१ जुलै पर्यंत ज्वारी, मका, तूर, सोयाबीन पिकासाठी ३० ऑगस्ट पर्यंत राहील. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी.

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम ३०० रुपये राहील व आदिवासी गटासाठी रक्कम १५० रुपये राहील. सहभागी शेतकऱ्यांनी प्रवेश शुल्क स्वतः ०४०१ पीक संवर्धन १०४ शेती क्षेत्रापासून प्राप्त जमा रक्कमा पीक स्पर्धा योजनेखालील जमा रक्कम शासकीय कोषागारात विहित मुदतीत जमा करावी.

बक्षिसाचे स्वरूप...

पहिले, दुसरे, तिसरे यानुसार तालुका पातळीवर ५ हजार रुपये, ३ हजार रुपये, २ हजार रुपये, जिल्हा पातळीवर १० हजार रुपये हजार, ५ हजार रुपये तर राज्य पातळीवर ५० हजार हजार रुपये, ४० हजार रुपये ३० हजार रुपये बक्षिस सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस स्वरूपात दिले जाईल. अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain: विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; मराठवाड्यातील काही भागातही मुसळधारेची शक्यता

ZP Elections 2025: रावेर येथे सहा गट, १२ गणांची रचना जाहीर

Green Hydrogen: हरित हायड्रोजन, फायबर बोर्डसाठी ऊस हा महत्त्वाचा घटक

Ozarakheda Dam: ‘हतनूर’चे वाहून जाणारे पाणी ‘ओझरखेडे’त

Agriculture Technology: भाजीपाला पुनर्लागवडीसाठी स्वयंचलित यंत्रांचा विकास

SCROLL FOR NEXT