थोडक्यात माहिती..१. मूग व उडीदाच्या शेंगा ७५% वाळल्यावरच तोडणी करावी.२. मळणीपूर्वी दाणे पूर्ण कोरडे असणे आवश्यक आहे.३. मळणी यंत्राचा वेग ३००-५०० फेरे प्रति मिनिट ठेवावा.४. मळणीनंतर दाणे क्लिनर किंवा ग्रेडरने स्वच्छ करावेत.५. वाळवलेले दाणे कडूनिंबाच्या पानासह कोरड्या जागेत साठवावेत..Legumes Farming Tips: राज्यात सध्या मूग आणि उडीदाच्या मळणीला वेग आला आहे. यांत्रिक पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने मुगाची मळणी केली जाते. मूग आणि उडीद मळणी करताना शेतकऱ्यांनी पिकांची योग्य वाळवण, मळणीवेळी बियाण्याची ओल, यंत्राची गती, स्वच्छता आणि साठवण या गोष्टींवर लक्ष ठेवणे फार महत्वाचे आहे..मूगाच्या शेंगा ७५ टक्के वाळल्यानंतर पहिली तोडणी करावी आणि त्यानंतर ८ ते १० दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात. शेंगा खळ्यावर चांगल्या वाळल्यावर मळणी करावी..काय काळजी घ्यावी:शेंगा वाळवणे: मूग आणि उडीदाच्या शेंगा सुमारे तीन चतुर्थांश वाळल्यानंतरच मळणी करावी. त्यावेळी दाणे सहज निघतात आणि फुटण्याचा किंवा तुकडे होण्याचा धोका कमी होतो..Mung Urad Kewda Disease: मूग आणि उडीदवरील केवडा रोगाचे करा व्यवस्थापन.बियांतील ओलावा: मळणी सुरू करताना बियांचा ओलावा केवळ अगदी तुरळक असावा. जास्त ओल असल्यास दाणे चिटकून खराब होतात, नासू शकतात,मळणी यंत्राचा वेग: मळणी करताना यंत्राचा वेग फार जास्त ठेवू नये. साधारण ३००-५०० फेरे प्रति मिनिट असेल तर दाणे फुटत नाहीत. फेऱ्यांचा वेग जास्त असल्यास बियांची डाळ होऊ शकते..स्वच्छता आणि वर्गीकरण: मळणी झाल्यावर दाण्यातील कचरा, कुट, काड्या, माती हे सगळे वेगळे काढावेत. तोडलेल्या शेंगा आणि बिया स्वच्छ करुन चांगले वाळवावे आणि मगच साठवावे. क्लिनर किंवा ग्रेडर यंत्र वापरून स्वच्छ करणे फायद्याचे ठरते, म्हणजे स्वच्छ डाळीसाठी दर चांगला मिळतो..साठवण: उडीदाची कापणी करुन खळ्यावर आणून त्याची मळणी करावी. साठवणीपूर्वी मूग व उडीद हे ४ ते ५ दिवस चांगले उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठवण कोंदट व ओलसर जागेत करु नये. साठवताना थोडासा कडूनिंबाचा पाला मूग उडिदात मिसळावा. त्यामुळे साठवणीत कीड लागत नाही. दाणे पूर्ण वाळवूनच पोत्यात भरावेत. पोती जमिनीपासून थोडे वर ठेवावेत, म्हणजे ओल किंवा वजनाचा त्रास होत नाही..वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):१. मूगाच्या शेंगा तोडणी कधी करावी?शेंगा ७५% वाळल्यावर पहिली तोडणी, उरलेल्या शेंगा नंतर.२. मळणीपूर्वी बियाण्यात किती ओलावा असावा?अगदी कमी, म्हणजे दाणे कोरडे व तुटणार नाहीत इतपत.३. मळणी यंत्राचा योग्य वेग किती ठेवावा?३००-५०० फेरे प्रति मिनिट इतका वेग मळणी यंत्राचा ठेवावा. ४. मळणी झाल्यानंतर दाणे स्वच्छ कसे करावेत?पारंपरिक पद्धत किंवा क्लिनर किंवा ग्रेडर यंत्र वापरून दाणे स्वच्छ करावेत.५. साठवणीत कीड लागू नये यासाठी काय करावे?वाळवलेल्या दाण्यांत कडूनिंबाचा पाला मिसळावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.