Pune News: राज्यातील परवानाधारक सावकरांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्याजदाराचा फलक दर्शनी भागात लावावा, असे आदेश सहकार आयुक्तालयाने दिले आहेत. सावकारांना कर्ज वाटताना ९ टक्क्यांपासून ते अगदी १८ टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारण्याची मुभा राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. .तारण व विनातारण कर्जाचे व्याजदर स्वतंत्र आहेत. मात्र दर सांगताना सावकारांकडून काही ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते. त्यामुळेच सावकारांना आता दर्शनी भागात व्याजदर फलकाची सक्ती करण्यात आली आहे. सावकाराला स्वतःचे नाव, परवाना क्रमांक, कार्यक्षेत्र, परवाना दिलेल्या सहकार विभागाच्या कार्यालयाचे नाव, शेतकरी व बिगरशेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या कर्जाचे व्याजदर, अशी तपशीलवार माहिती या फलकावर देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे..Moneylender Loan: सावकारी कर्जाचा विळखा.सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, कोणत्याही डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याचे मूळ वैद्यकीय शिक्षणाचे प्रमाणपत्र दर्शनी भागात पाहण्याचा रुग्णाला अधिकार असतो. त्याचप्रमाणे परवानाधारक सावकाराचा परवाना व व्याजदराची माहिती पाहण्याचा अधिकार शेतकऱ्याला आहे. राज्यात महाराष्ट्र सावकारी कायदा २०१४ लागू आहे. त्यातील कलम ३१(१) मधील नियम १४ नुसार सहकार विभाग सावकाराला सूचना देऊ शकते..या तरतुदीनुसार सर्व सावकारांना दर्शनी भागात ३ फूट बाय २ फूट आकाराचा काळ्या फलकारावर पांढऱ्या अक्षरात व्याजदर फलक लावावाच लागेल. सावकाराने व्याजदराचा केवळ तपशील या फलकावर द्यायचा नसून त्याला दिलेल्या अधिकृत परवान्याची प्रतदेखील फलकावर लावायची आहे. या सूचनेचे उल्लंघन होत असल्यास शेतकऱ्याला सावकारी तथा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार करता येईल..Money Lending License : अवघ्या ५०० रुपयांत मिळतो सावकारी परवाना .सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सावकारांनी व्याजदराचे फलक लावले की नाही याची तपासणी सर्वत्र झालेली नाही. सहकार आयुक्तालयाने जिल्हा उपनिबंधकांना तपासणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, काही गावांमध्ये तपासणीच झालेली नाही. महाराष्ट्र राज्य सावकारग्रस्त शेतकरी समितीचे अध्यक्ष अरुण इंगळे यांनी सांगितले, की व्याजदर फलक लावण्यासाठी समितीने पाठपुरावा केला होता. त्यामुळे सहकार आयुक्तालयाच्या आदेशाचे स्वागत करतो. परंतु याची अंमलबजावणी होण्यासाठी आयुक्तालयाने नियोजन करायला हवे.....असे आहेत सावकारी कर्जाचे व्याजदरकर्जाचा प्रकार जास्तीत जास्त व्याजदर (प्रतिवर्षी)शेतकऱ्यांसाठी तारण कर्ज ९ टक्केशेतकऱ्यांसाठी विनातारण कर्ज १२ टक्केबिगरशेतकऱ्यांसाठी तारण कर्ज १५ टक्केबिगरशेतकऱ्यांसाठी विनातारणकर्ज १८ टक्के.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.