थोडक्यात माहिती...१. शेतात आडवे चर घेऊन निचरा व्यवस्थित ठेवावे जेणेकरुन पाणी साचणार नाही.२. सेंद्रिय उपायांमध्ये ट्रायकोडर्मा प्लस + शेणखत जमिनीत मिसळून टाकणे.३. कुजलेले कंद नष्ट करावेत, त्यांना उपटून जाळून टाकावेत, बांधावर टाकू नयेत.४. कार्बेन्डाझीम / मॅन्कोझेब / कॉपर ऑक्झिक्लोराइड पाण्यात मिसळून मुळांशी आळवणी करावी.५. रोगाची तीव्रता वाढल्यावर मेटॅलॅक्सिल + मॅन्कोझेब किंवा हेक्झाकोनॅझोल वापरावे..Turmeric Farming Tips: यंदा हळद पिकाची २५टक्क्यांनी जास्त लागवड झालेली आहे. पीक चांगल्या जोमात वाढत असतानाच राज्यात पावसाने थैमान माजवले. शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे हळद पिकावर कंदकुज रोगाची लागण दिसत आहे. आत्ताच्या परिस्थितीनुसार २५ टक्के नुकसान होऊ शकते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तरी वेळीच योग्य उपाययोजना केल्यास शेतकरी कंदकुजावर नियंत्रण मिळवू शकतात..कंदकुजाची लक्षणेकंदकुज हा बुरशीजन्य रोग आहे. यामध्ये सुरुळीच्या पानाचे टोक व कड पिवळे पडतात आणि कालांतराने पुढे संपूर्ण पानच वाळते. बुंधा अर्थात गड्ड्याजवळचा भाग काळपट दिसतो. आजारी झाड सहज उपटता येते. जमिनीतला कंद मऊ होतो व दुर्गंधी सुटते. या रोगामुळे पिकाची सुरळी म्हणजेच मुख्य पान सर्वात आधी मरते..रोगासाठीचे अनुकुल घटकवारंवार भरपूर पाऊस झाल्यावर किंवा वातावरणात जास्त आर्द्रता असल्यास रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. तसेच ढगाळ व उबदार हवामानही या बुरशी वाढते. शेतातील माती जड काळी माती असेल आणि पाण्याचा निचरा नीट होणारी नसेल तरीही रोगाची शक्यता वाढते..Banana Karpa Disease: केळीवरील करपा रोगाचे व्यवस्थापन.कंदकुजाचे व्यवस्थापनया रोगासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून ट्रायकोडर्मा प्लस २ ते २.५ किलो, २५०-३०० किलो शेणखतात मिसळून एकरी जमिनीत टाकावेहळदीच्या शेतात वेळोवेळी आंतरमशागत करत राहावी. आंतरमशागत करताना गड्ड्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.रोगाची लक्षणे दिसल्यास कुजलेले कंद उपटून जाळून टाकावेत पण कुजलेले गड्डे बांधावर फेकू नयेत..या रोगाच्या नियंत्रणासाठी शेतात आडवे चर घेऊन पाणी साचू देऊ नका. साचलेल्या पाण्याने कंदकुज रोग जास्त वाढतो.मातीचे संतुलन टिकवण्यासाठी माती आदर्श स्थिती असणे आवश्यक असते. म्हणजेच मातीमध्ये माती ४५%, सेंद्रिय पदार्थ ५%, हवा २५%, पाणी २५% असावी तर पिक चांगले वाढते. कारण जमिनीत जास्त पाणी राहिल्यास कंद लगेच कुजतो.कार्बेन्डाझीम ५० डब्ल्यू पी (वेटेबल पावडर) १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ डब्ल्यू पी (वेटेबल पावडर) २ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड ५० डब्ल्यू पी ५ ग्रॅम या बुरशीनाशकांची हळदीच्या मुळांशी प्रति एक लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.तीव्रता वाढल्यास:हळदीवरील कंदकुजाची तीव्रता वाढल्यास मेटॅलॅक्सिल + मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक २ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल ५ ईसी हे बुरशीनाशक ०.५ ते १ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे..लक्षात ठेवा:आळवणी करताना माती ओली असावी, पण पाणी साचलेले नसावे.आळवणीनंतर पिकावर थोडा पाण्याचा ताण द्यावा.गरज वाटल्यास दुसऱ्यांदा आळवणी करावी.औषधाच्या पाण्यात स्टिकर १ मि.ली. प्रति लिटर घालावे, जेणेकरुन ते चांगल्या प्रकारे पाने आणि कंदांना चिटकून राहिल..वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):१. कंदकुज रोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती? सुरुळीच्या पानाचे टोक पिवळे पडणे व कंद मऊ होणे.२. हळदीत कंदकुज टाळण्यासाठी पहिली काळजी कोणती घ्यावी? शेतात पाणी साचू देऊ नये, निचरा चांगला असावा.३. सेंद्रिय उपायाने कंदकुजावर नियंत्रण शक्य आहे का? होय, ट्रायकोडर्मा प्लस + शेणखत प्रभावी ठरते.४. बुरशीनाशक वापरताना कोणती काळजी घ्यावी?आळवणी करताना माती ओली असावी, पण पाणी साचलेले नसावे.५. तीव्रता वाढल्यास कोणते औषध फवारावे? मेटॅलॅक्सिल + मॅन्कोझेब किंवा हेक्झाकोनॅझोल पाण्यात मिसळून फवारावे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.