Kharif Agriculture
Kharif Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : खरिपाचे क्षेत्र पावणेतीन हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात यावर्षीच्या (२०२४-२५) खरिप हंगामात ५ लाख २० हजार ९० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. गतवर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत यंदा जिल्ह्यातील खरिपाच्या क्षेत्रात २ हजार ७८२ हेक्टरने वाढ होण्याचा अंदाज आहे.

यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात २१ हजार २५७ हेक्टरने घट तर कपाशीच्या क्षेत्रात ४ हजार ४७८ हेक्टरने वाढ होण्याचा अंदाज आहे.तूर,मूग,ॉउडिद आदी कडधान्ये पीकांच्या क्षेत्रात १७ हजार १५९ हेक्टरने तर ज्वारी,मका या तृणध्यान्यांच्या क्षेत्रात २ हजार ४०१ हेक्टरने वाढ अपेक्षित आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी यांनी दिली.

परभणी जिल्ह्यात २०१८-१९ ते २०२३-२४ या पाच वर्षातील खरिपाचे सरासरी क्षेत्र ५ लाख २१ हजार ३२५ हेक्टर आहे. गतवर्षी (२०२३) एकूण खरिपाची ५ लाख १७ हजार ३०८ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा सोयाबीन वगळता अन्य पीकांच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यात ज्वारीच्या क्षेत्रात २ हजार ४७१ हेक्टरने, मक्याच्या क्षेत्रात ११० हेक्टरने वाढ प्रस्तावित आहे.

तुरीच्या क्षेत्रात ८ हजार ६३९ हेक्टरने, मुगाचे क्षेत्र ७ हजार ४५० हेक्टरने, उडदाचे क्षेत्र १ हजार १९७ हेक्टरने वाढीची शक्यता आहे. गतवर्षी सोयाबीनची २ लाख ७१ हजार १२४ हेक्टरवर पेरणी झाली होती. परंतु कमी बाजारभाव, वाढेलेला उत्पादन खर्च, घटलेली उत्पादकता आदी कारणांमुळे यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात २१ हजार १२४ हेक्टरने घट होऊन २ लाख ५० हजार हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज आहे.

कपाशीची १ लाख ९२ हजार ५२२ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा त्यात ४ हजार ४७८ हेक्टरने वाढ होऊन १ लाख ९९ हजार हेक्टरवर लागवड होऊ शकते. तीळाच्या क्षेत्रात ५४ हेक्टरची वाढ अपेक्षित आहे.

शेतकऱ्यांना अपेक्षित दर न मिळाल्यामुळे यंदा सोयाबीनच्या क्षेत्र घट होऊ शकते. कपाशी आणि तुरीच्या क्षेत्रात वाढ प्रस्तावित आहे.
अनिल गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी.

परभणी जिल्हा खरीप पेरणी तुलनात्मक स्थिती (हेक्टरमध्ये)

पीक २०२३

पेरणी क्षेत्र २०२४ प्रस्तावित क्षेत्र

सोयाबीन २७११२४ २५००००

कपाशी १९२५२२ १९७०००

तूर ३७००० ४५६४०

मूग ८५५९ १६०००

उडिद ३८०३ ५०००

ज्वारी २२२८ ४७००

बाजरी ५२८ ५००

मका ८९० १०००

तीळ १९६ २५०

कारळे ६२ --

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mosambi Orchard : कहाणी वाळलेल्या मोसंबी बागेची

Bidri Sugar Factory : कारवाई मागे घ्या, अन्यथा तीव्र लढा, 'बिद्री’च्या शेतकरी, सभासदांचा कागल तहसीलवर मोर्चा

Ashadhi Wari 2024 : वारीची वाटुली सोपी होय

Koyna Dam : कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

Farmer Loan Waive : कर्जमुक्‍तीशिवाय आता माघार नाही

SCROLL FOR NEXT