Kharif Sowing : खरीप पेरा ३० हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता

Kharif Season : यंदा पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरिपाच्या क्षेत्रात आणखी किमान ३० हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाची तयारी पूर्ण झाली असून, जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी क्षेत्र २ लाख ८९ हजार ५७० हेक्टर इतके आहे. पण गतवर्षी ३ लाख ४६ हजार २१५ हेक्टरवर पेरणी झाली होती, यंदा पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरिपाच्या क्षेत्रात आणखी किमान ३० हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्हा रब्बीचा म्हणून गणला जातो, पण अलीकडच्या काही वर्षात खरिपातही पिके होत आहेत. गेल्या अनेक वर्षांत खरिपातील बाजरी, भुईमूग आदी पिकांचे क्षेत्र कमी झाले आहे. तर त्या ऐवजी सोयाबीन, तूर, उडीद, मका या पिकांचे क्षेत्र वाढले आहे. या पिकामुळे पेरणी क्षेत्रातही वाढ झाली आहे.

Kharif Sowing
Kharif Management : हवामान बदलातील खरीप नियोजन

यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने किमान ३० हजार ५०८ हेक्टरने वाढ होईल, असा अंदाज आहे, हे गृहीत धरून कृषी विभागाने नियोजन केले आहे. प्रामुख्यानो सोयाबीन, तूर या पिकांच्या क्षेत्रात वाढ होईल, यंदा सोयाबीनच्या दरात फारशी वाढ झालेली नाही, पण तुरीचे दर प्रतिक्विंटलला उच्चांकी दहा हजार रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. त्यामुळे त्याकडे शेतकऱ्यांचा कल असेल, जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यात सर्वाधिक पेरा होईल, अशीही शक्यता आहे.

घरचे सोयाबीन वापरण्यासाठी मोहीम

गेल्यावर्षी जिल्ह्यात १ लाख ३३ हजार २११ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा १ लाख ३५ हजार हेक्टरवर ती पोचण्याचा अंदाज आहे. तीन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये ११ हजार ५०१ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची जिल्ह्यात विक्री झाली होती. ती आता १५ हजार ४६० क्विंटलपर्यंत वाढली आहे. यावरून सोयाबीनच्या क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते.

Kharif Sowing
Kharif Sowing : यंदाचे खरीप क्षेत्र राहणार साडेचार लाख हेक्टरवर

सोयाबीनच्या बियाण्यांची ही मागणी लक्षात घेऊन कृषी विभागाने घरचे सोयाबीन बियाणे वापरा, अशी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यातून तब्बल १३ हजार ५०० क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. कृषी विभागाने त्यासाठी बीजोत्पादन कार्यक्रम आखला, त्या उपक्रमात ७५२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून, ८५ प्रात्यक्षिकांच्या बियाण्यांची चाचणीही केली गेली आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.

तालुकानिहाय प्रस्तावित पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

उत्तर सोलापूर - २६,८३३, दक्षिण सोलापूर - ४२,५९८, अक्कलकोट - १,०१३९८, बार्शी - ६२,७६३, मंगळवेढा - १८,९६३, पंढरपूर - २२,२५४, सांगोला - २७,६०५, माळशिरस - ५५४७, मोहोळ - ३०,१२२, माढा - १५,९९७, करमाळा - २२,६४१, एकूण - ३,७६ हजार ७२२३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com