Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Washim Kharif Sowing : खरिपात ६१ हजार हेक्टरवर पेरा प्रस्तावित

Kharif Season 2025 : यंदाच्या खरीप हंगामातील नियोजनासंदर्भात कृषी विभागामार्फत माहिती देण्यात आली आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

Team Agrowon

Washim News : यंदाच्या खरीप हंगामात पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यामध्ये ६१५३३ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली असून, गतवर्षी झालेल्या प्रत्यक्ष पेरणीच्या तुलनेत यंदाचे प्रस्तावित क्षेत्र १ हजार ७९ हेक्टरने वाढविण्यात आले आहे. १ हजार ४० हेक्टर सोयाबीन पेरणीत वाढ प्रस्तावित आहे.

यंदाच्या खरीप हंगामातील नियोजनासंदर्भात कृषी विभागामार्फत माहिती देण्यात आली आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये गतवर्षी झालेल्या प्रत्यक्ष पेरणीच्या तुलनेत अधिक क्षेत्रावर खरीप पेरणी प्रस्तावित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मंगरूळपीर तालुक्यात सरासरी ६१,५३३ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी अपेक्षित असते. यामध्ये सोयाबीन ४६,६२८ हेक्टर, तूर ११,२२८ हेक्टर, कपाशी २३,५७ हेक्टर, असे मुख्य पिकांचे क्षेत्र आहे. त्याशिवाय मूग, उडीद, ज्वारी, बाजरीसह इतरही काही पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.

खरीप हंगामात बियाणे बदलानुसार शेतकऱ्यांना बाजारातून ३० टक्के खरेदी करावे लागते. ही बाब लक्षात घेता मंगरूळपीर तालुक्यातील पेरणीच्या नियोजनानुसार प्रस्तावित बदलाप्रमाणे सोयाबीन, तूर, कपाशी, मूग, उडीद, ज्वारीसह विविध पिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पीकनिहाय पेरणी क्षेत्र हेक्टरमध्ये

सोयाबीन ४६६२८

तूर ११२२८

मूग १६५

उडीद २०९

कापूस २३५७

तालुक्याचे खरीप हंगाम क्षेत्र स्थिती

वहिती खालील क्षेत्र ६१२७९

प्रस्तावित पेरणी क्षेत्र ६१५३३

घरगुती सोयाबीन बियाणे - ५५,९११ क्विंटल

रासायनिक खतांचा वापर १२,००० टन

संकरित बीटी कपाशीची पूर्वमोसमी लागवड मृग नक्षत्रापूर्वी करू नये. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी जून महिन्यापूर्वी कपाशी पिकाची लागवड करू नये, तसेच शेतकऱ्यांनी घरगुती राखून ठेवलेल्या सोयाबीन पिकाच्या बियाण्याची तसेच बाजारातून विकत घेतलेल्या बियाण्याची उगवणशक्ती तपासूनच उगवणक्षम बियाण्याची पेरणी करावी. रासायनिक खताचा संतुलित वाजवी वापर करावा. माती परीक्षण केलेले असल्यास आरोग्य पत्रिकेतील शिफारशीप्रमाणे रासायनिक खताचा वापर करावा. पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.
- सचिन कांबळे, तालुका कृषी अधिकारी, मंगरूळपीर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price: कापसासाठी भावांतर योजना राबवण्याचा प्रस्ताव नाही, पणनमंत्र्यांची माहिती

Onion Procurement Pending Bills: कांदा खरेदीचे २० कोटी रुपये मिळणार; ३ हजार ५०० रुपये हमीभावाची मागणी

Maharashtra Weather Update: उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज; राज्यातील किमान आणि कमाल तापमानात होतेय वाढ

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा वंचित शेतकऱ्यांना लाभ देणार; सहकारमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

Gram Panchayat Administration: मुदत संपलेल्या ५२५ ग्रामपंचायतींवर सरपंच बनले प्रशासक

SCROLL FOR NEXT