प्रतिभा जाधवकधीही विपश्यनेस न गेलेलेच विपश्यना शिबिराबद्दल काहीबाही सांगत राहतात. तसे काही महाभाग मलाही भेटले. पण ‘विपश्यना’ ही सांगण्याची नाही तर अनुभवण्याची क्रिया आहे या मतावर मी आता ठाम झाले आहे. त्यामुळे जाताना पाटी जेवढी कोरी असेल तेवढे उत्तम!माझी अनेक वर्षांची एक ‘बकेट लिस्ट’ आहे. ही बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी सर्व गोष्टींचा यथायोग्य मेळ जमवून आणण्याचा मी सतत प्रयत्न करत असते. अगदी दैनिक ते मासिक आणि मासिक ते वार्षिक नियोजन करत असते. प्रत्येकवेळी आपण नियोजित केलेल्या गोष्टी घडतातच असे नाही कारण मानवी आयुष्यातही अस्मानी सुलतानी असतेच की! जन्म, संस्कार शिक्षण, उदरनिर्वाहासाठी नोकरी-व्यवसाय, लग्न, अपत्यप्राप्ती, मुलांचे संगोपन, त्यांचं करियरची सुरुवात, क्षेत्रनिवड वगैरे वगैरे अशी नाना अटळ अडथळ्यांची शर्यत माणसाच्या आयुष्यात अव्याहत सुरूच असते. .बारावीनंतर मुलांच्या भविष्याची, कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात होते व घर गंभीर होत जाते. तसे आमच्याही घरात दोन वर्षे बऱ्यापैकी गंभीर वातावरण होते. गंमत म्हणजे अलीकडे मुलांपेक्षा पालकच याबाबतीत अधिक गंभीर असतात. त्यांना आता तत्त्वज्ञानाचे डोस नको असतात. कारण त्यांना आता बाहेरच्या जगात झेपावण्यासाठी पंख फुटलेले असतात, थोडीशी ‘अस्तित्वाची’ जाणीव होऊ लागलेली असते. कुमारवयातील त्यांचे बाहेरच्या विश्वातील पहिलेवहिले पाऊल असते ते जेवढे या वाटचालीसाठी उत्सुक असतात तेवढेच भांबावलेले..India's GDP Growth: जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत आर्थिक वाढ ८.२ टक्क्यांवर; सलग दोन तिमाहीमध्ये वाढ.आईवडील जे सांगतात ते काहीसे दुय्यम आणि समवयस्क मित्र सांगतात ते सारं प्रथम हा त्यांचा दृष्टिकोन असतो. खरे तर या ठिकाणी पालक चुकीचे नसतात की मुलंही; तर इथे पालक व मुलांचे विभिन्न वय आणि त्यांच्या वाट्याला त्या-त्या काळात आलेल्या सुविधा वा वंचना असतात. मागच्या पिढीने संघर्षातून पाय भक्कम केलेले असतात, वही–पुस्तक वा अगदी पायातल्या वहाणेसाठीही संघर्ष केलेला असतो. आताच्या पिढीचा तसा काही खडतर प्रवास नसतो.पालक म्हणून हा अनुभव पालकांना नवीन असतो तसा मुलांसाठीही नवीन असतो..ह्या काळात पालकांचे प्राधान्यक्रम पूर्णतः बदलून मुलांवर केंद्रित झालेले असतात. संवाद-विसंवाद ह्या प्रक्रियेतून जाताना कारकीर्द निवडीचे अधिक-उणे समजावून सांगताना पालकांची चांगलीच दमछाक होत असते. सुवर्णमध्य साधून एका निर्णायक क्षणी शेवटी `करिअर निवड’ होते. पालक हुश्श म्हणत त्यांचा जीव भांड्यात पडतो. मूल आता बाहेरच्या जगात तावून सुलाखून निघेल, त्याचे त्याला जगण्याचे लढण्याचे आकलन होऊ लागेल ह्या विचाराने निःश्वास सोडतात..Growth Centre: ‘ग्रोथ सेंटर’ला मिळणार १० टीएमसी पाणी.आता ठेचा लागो, पडो-धडपडो त्याचा तो तोल सावरेल, उभं राहील हा आशावादही वाटू लागतो व त्यानंतर राहून गेलेल्या स्वतःच्या ‘बकेट लिस्ट’कडे आपले लक्ष जाते. हा टप्पा पालक म्हणून माझ्याही आयुष्यात नुकताच येऊन गेलाय. माझ्या बकेट लिस्टकडे माझे लक्ष गेले तेव्हा सर्वात वर ‘दहा दिवसांचे विपश्यना शिबि्र’ पूर्ण करणे ही बाब होती. ऑनलाइन अर्ज करून, अनेकांचे अनुभव ऐकून, मार्गदर्शन घेऊन मी दिवाळी सुट्टीत विपश्यनेस जाण्याचे ठरवले..अगदी जवळच जातानाही नळ, लाईट, गॅस सिलिंडर बंद आहेत नं? याची खात्री करणाऱ्या बाया दहा दिवस बाहेर पडतात तेव्हा कितीतरी व्यवस्था करून बाहेर पडत असतील तशी मीही कुटुंबाची उत्तम व्यवस्था लावून विपश्यना शिबिरात दाखल झाले. दहा दिवसांसाठी माझ्यातून जग वजा करून व जगातून स्वतःला दहा दिवसांसाठी वजा करून एक आगळावेगळा अनुभव घ्यायला मी सज्ज झाले. हा खरे तर मला अंतर्बाह्य नवीन करणारा, जगण्याच्या अनित्याची जाणीव करून देणारा, दु:खमुक्ती मानवी आयुष्यात शक्य, साध्य होऊ शकते याचे दर्शन देणारा ठरला..विपश्यना म्हणजे...विपस्सना (पाली) किंवा विपश्यना (संस्कृत) ही गौतम बुद्ध यांनी सांगितलेली २६ हजार वर्षांपूर्वीची ध्यान पद्धती आहे. प्रचलित अर्थाने ‘विपश्यना’ या नावाने ही ध्यान पद्धती जगभरात प्रसिद्ध आहे. बुद्धांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा विषय म्हणजे हे ‘ध्यान’ होय. पाली भाषेत ‘विपस्सना’ शब्दाचा अर्थ ‘स्वतःच्या आत डोकावणे’ असा होतो. गौतम बुद्धांनी स्वतः या ध्यान पद्धतीचा अभ्यास करून; तिच्या आचरणाचे महत्त्व अनुभवून अंतर्ज्ञान प्राप्त केले..विपश्यना म्हणजे ‘विशेष दृष्टी’ होय. या ध्यान पद्धतीत श्वासावर आणि शारीरिक संवेदनांवर लक्ष केंद्रित केले जाते, ज्यामुळे आत्मजागरूकता वाढते आणि विचार, भावनांची तटस्थपणे नोंद घेण्यास मदत होते. विपश्यना साधनेमुळे तणाव कमी होतो, मानसिक आरोग्य सुधारते, आत्मशुद्धी साधता येते. ‘विपश्यना’ म्हणजे ‘वस्तुस्थिती जशी आहे तसेच पाहणे’ किंवा ‘भेदक दृष्टी.’ या साधनेत नैसर्गिक श्वासाचे निरीक्षण करून सुरुवात केली जाते. हळूहळू, शरीर आणि मनाच्या बदलत्या स्थितींचे, तसेच विचारांचे आणि भावनांचे तटस्थपणे निरीक्षण करायला शिकवले जाते. मला तर हे अनुभवताना ‘कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी? ह्रदयातील भगवंत राहिला ह्रदयातून उपाशी’ ह्याच ओळी आठवत गेल्या...pratibhajadhav279@gmail.com(लेखिका साहित्यिक, वक्ताव एकपात्री कलाकार आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.