Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊपैकी दोन खरेदी केंद्रांवरून ४७ शेतकऱ्यांकडील ६६० क्विंटल सोयाबीनची ५३२८ रुपये प्रति क्विंटल या आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली. .जिल्ह्यात सोयाबीनची आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी ९ केंद्रे सुरू करण्यात आली. या सर्व केंद्रांवरून ६२४ शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीने सोयाबीन विक्रीसाठी अधिकृत नोंदणी केली होती. यापैकी १२८ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठी एसएमएस पाठविण्यात आले. तर ४९८ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविणे बाकी होते. .Kharif Procurement: धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन, उडदाची हमीभावाने खरेदी सुरू.एसएमएस पाठवलेल्या शेतकऱ्यांपैकी खुलताबाद येथील केंद्रावरून १६ शेतकऱ्यांकडील १७५ क्विंटल सोयाबीनची आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली. तर पाचोड येथील केंद्रावरून ३१ शेतकऱ्यांकडील ४८५ क्विंटल सोयाबीनची आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली. पाचोड येथील केंद्रावरून १८३ शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली असून खुलताबादच्या केंद्राहून १८५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असल्याची .Soybean Bhavantar : मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनचा भावफरक केला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा; महाराष्ट्रात मात्र सोयाबीन खरेदी कासव गतीने.माहिती नाफेडच्या जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, खुलदाबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री व संत ज्ञानेश्वर कृषी सेवा सहकारी संस्था असे एकूण ९ ठिकाणी तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे सोयाबीन खरेदी केंद्र आहेत..छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किमान आधारभूत दरानुसार नोंदणी/एनसीसीएफमार्फत हंगाम २०२५-२६ करिता सोसायटी विक्रेत्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड व आकाश ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनी अशा दोन ठिकाणी सोयाबीन नोंदणी सुरू आहे. सोयाबीन विक्रीसाठी ई-समृद्धी ॲपवर तर मक्याकरिता स्वतंत्र लिंकवर नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.