Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड तसेच खानदेशातील जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील सुमारे २० कारखान्यांनी २० लाख ५८ हजार ७६५ टन उसाचे गाळप करत सरासरी ६.६१ टक्के साखर उताऱ्याने १३ लाख ६१ हजार ५३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे..या संदर्भात प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, की यंदाच्या उस गाळपात पाच जिल्ह्यांतील २० कारखान्यांनी आजवर सहभाग घेतला. त्यामध्ये नंदुरबार व जळगावमधील प्रत्येकी एक तर छत्रपती संभाजीनगरमधील ७, जालन्यातील ३ तर बीडमधील ८ कारखान्यांनी आतापर्यंत सहभाग नोंदविता..Sugarcane Rate: ‘स्वाभिमानी’च्या रेट्यामुळेच सांगलीत कारखान्यांकडून ऊसदर जाहीर.गाळप हंगामात आतापर्यंत सहभागी कारखान्यांमध्ये सहकारी ११ तर खासगी ९ कारखान्यांचा समावेश आहे. ११ सहकारी कारखान्यांनी ८ लाख ४६ हजार ७५६ टन उसाचे गाळप करत सरासरी ६.२१ टक्के साखर उताऱ्याने ५ लाख २५ हजार ५४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर खासगी ९ कारखान्यांनी १२ लाख १२ हजार ०९ टन उसाचे गाळप करत सरासरी ६.९ टक्के साखर उताऱ्याने ८ लाख ३५ हजार ९९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. .चार कारखान्यांचे गाळप बंदबीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना, जय भवानी सहकारी साखर कारखाना, सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळप रविवारी (ता. ३०) बंद होते. याशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना गाळपही बंद असल्याचे अहवालावरून पुढे आले. .Sugarcane Crushing : सांगली जिल्ह्यातील पंधरा कारखान्यांकडून ४१ लाख टन गाळप.जिल्हानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन स्थिती नंदुरबार : जिल्ह्यातील एका खासगी कारखाने १ लाख ४३ हजार ५३० टन उसाचे गाळप करत सरासरी ५.१३ टक्के साखर उताऱ्याने ७३ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जळगाव : जिल्ह्यातील एका सहकारी कारखान्याने ३९ हजार ८८९ टन उसाचे गाळप करत सरासरी ७.११ शक्ती साखर उताऱ्याने २८ हजार ३७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील २ सहकारी व ५ खासगी मिळून ७ कारखान्यांनी ६ लाख ३२ हजार ८४ टन उसाचे गाळप करत सरासरी ७.९८ टक्के साखर उताऱ्याने ५ लाख ५ हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले..जालना : जिल्ह्यातील दोन सहकारी व एक खासगी मिळून तीन कारखान्यांनी ३ लाख ७५ हजार ६४५ उसाच गाळप करत सरासरी ६.३ टक्के साखर उताऱ्याने २ लाख ३६ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.बीड : जिल्ह्यातील सहा सहकारी व दोन खासगी मिळून ८ कारखान्यांनी ८ लाख ६७ हजार ३६ टन उसाचे गाळप करत सरासरी ५.९७ टक्के साखर कारखाने ५ लाख १७ हजार ५५५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.