Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : पावसाची उघडीप, आंतरमशागतीस वेग

Khandesh Rain Update : खानदेशात मागील दोन दिवसांपासून अनेक भागात पाऊस अपवाद वगळता झालेला नाही.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील दोन दिवसांपासून अनेक भागात पाऊस अपवाद वगळता झालेला नाही. यामुळे आंतरमशागतीस गती येत आहे. पिकांत तणनाशकांची फवारणी व अन्य कामे सध्या सुरू आहेत.

हलक्या, मुरमाड जमिनीत पावसाची गरज आहे. पण काळ्या कसदार जमिनीत पावसाची फारशी गरज नाही. आंतरमशागतीसाठी शेतकरी उघडीप मिळण्याची प्रतीक्षा करीत होते. किरण काळ्या कसदार, पाण्याचा निचरा न होणाऱ्या क्षेत्रात पावसाची गरज फारशी नाही. शेतीकामे मागील आठवड्यात ठप्प होती.

कारण अनेक दिवस पावसाची रिपरिप होती. उघडीप नसल्याने आंतरमशागत व अन्य कामे रखडली होती. ही कामे गती घेत आहेत. खानदेशातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. जळगाव, भुसावळ, जामनेर भागात पाऊस नाही. कुठेही मागील दोन दिवसात जोरदार पाऊस झालेला नाही.

तसेच चोपडा, यावल, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव आदी भागातही पावसाने उघडीप दिली आहे. धुळ्यातील धुळे, साक्री भागातही पाऊस नसल्याने या भागातही शेतीकामे सुरू झाल्याची स्थिती आहे.

पावसाने कोरडवाहू पिकांना दिलासा मिळाला आहे. उडीद व मूग पिकात वाफसा हवा असून, आंतरमशागत, तणनाशकांची फवारणी सुरू आहे. पिकांत सध्या अतिपावसाची किंवा जोरदार पावसाची गरज नाही.

पण मध्येच ढगाळ, आर्द्रतायुक्त वातावरणही तयार होत आहे. काही भागात सूर्यदर्शनही होत आहे. यामुळे चांगला वाफसा होत आहे. खानदेशात यंदा पाऊसमान बरे आहे. जूनमध्ये सरासरीच्या अधिकचा पाऊस जळगावात झाला. फक्त रावेर, अमळनेर व यावल तालुक्यात कमी पाऊस होता. धुळ्यातही पाऊसमान बरे आहे. जोरदार पाऊस यंदा फारसा झालेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nagpur Winter Session: कृषी विभागाचे निधीकडे लक्ष

Developed India: विकसित भारत घडविण्यासाठी ग्रामीण भारत एक निर्णायक शक्ती

Sugar Procurement: नवीन साखरेमुळे खरेदी मंदावली

Onion Import: बांगलादेश भारताकडून पंधराशे टन कांदा घेणार

Maharashtra Cold Wave: पूर्व विदर्भात थंडीची लाट शक्य

SCROLL FOR NEXT