Karaha River Agrowon
ॲग्रो विशेष

Kewda Forest Destroyed: नदी सुशोभीकरणासाठी बारामतीतील केवड्याचे बन उद्ध्वस्त

Baramati Development: कऱ्हा नदी सुशोभीकरणासाठी नदी परिसंस्थेतील महत्त्वाचा भाग असलेल्या केवड्याचे बन ठेकेदाराने उद्ध्वस्त केले आहे.

Team Agrowon

Pune News: विकास प्रकल्पासाठी हैदराबाद येथील ४०० एकर वन उद्ध्वस्त करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी अधिकाऱ्यांवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ही ओढले. मात्र आता तसाच प्रकार बारामतीमध्ये घडला आहे.

कऱ्हा नदी सुशोभीकरणासाठी नदी परिसंस्थेतील महत्त्वाचा भाग असलेल्या केवड्याचे बन ठेकेदाराने उद्ध्वस्त केले आहे. या बाबत पर्यावरण अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली असून, या उद्ध्वस्त बनाच्या संवर्धनाची मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून १०० कोटी रुपये खर्चून ८ किलोमीटरच्या कऱ्हानदी पात्राचे सुधारणा आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे. हे करत असताना नदी परिसंस्थेतील महत्त्वाचा भाग असलेल्या आणि जैवविविधतेने समृद्ध असलेल्या केवड्याचे बन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अक्ष्यम्य दुर्लक्षामुळे ठेकेदाराने थेट जेसीबी लावून उद्ध्वस्त केल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासक डॉ. महेश गायकवाड यांनी केला आहे.

दरम्यान या प्रकरणी सजग नागरिकांनी अधिकाऱ्यांना या बाबतची विचारणा केली असता, अधिकाऱ्यांनी आम्ही योग्य ते काम केले आहे. आम्ही कागदोपत्री योग्य आहोत. तुम्हाला वाटत असेल तर न्यायालयात जा अशी मुजोरीची भाषा वापरल्याचे नागरिकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: टोमॅटो दरात सुधारणा; सिताफळाला चांगला भाव, गवार तेजीत तर हळद-केळी दर स्थिर

Monsoon Rain: राज्यात पाऊस कमी होणार; मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार

Solar Project Nashik : दिवसा वीज देण्यासाठी सौरप्रकल्प पूर्ण करा

Livestock Market : बुलडाणा जिल्ह्यात जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार

Day-Time Electricity : अकोलेकाटी परिसरात दिवसा वीजपुरवठा

SCROLL FOR NEXT