Fruit Farming: नक्षलप्रवण गडचिरोली फळपिकातून समृद्ध

Gadchiroli Agri Success: गडचिरोलीसारख्या नक्षलप्रवण व आदिवासीबहुल भागात कृषी विभागाच्या पुढाकाराने रोजगार हमी योजनेअंतर्गत विक्रमी १०६६ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. हा बदल आर्थिक समृद्धीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल मानला जात आहे.
Fruit Farming
Fruit FarmingAgrowon
Published on
Updated on

Gadchiroli News: पूर्व विदर्भातील सहापैकी पाच जिल्ह्यांमध्ये धान (भात) लागवड होते. मात्र एकाच पिकावर अवलंबिता असल्याने आर्थिक संपन्नता या भागातील शेतकऱ्यांना गाठता आली नाही. त्याच्याच परिणामी कृषी विभागाकडून या भागात फळपिकांसह व्यावसायिक पिकांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच परिपाक म्हणजे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून पहिल्यांदाच विक्रमी १०६६.६७ हेक्‍टरची फळबाग लागवड करण्यात आली आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर तसेच नागपूर जिल्ह्यांचा काही भाग अशा पाच जिल्ह्यांमध्ये धानाची लागवड होते. परंतु तंत्रज्ञानाचा अवलंब कमी असल्याने या पिकाची उत्पादकता कमी आहे. त्याच्याच परिणामी शेतकऱ्यांमध्ये देखील समृद्धी येऊ शकली नाही. त्याची दखल घेत कृषी विभागाकडून या भागात पीक बदलाकरिता शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृतीवर भर दिला जात आहे.

Fruit Farming
Fruit Farming : दुष्काळी गावांनी साधली फळबागांमधून प्रगती

कृषी विभागाच्या या प्रयत्नांना साथ देत २०२४-२५ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठ्या क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. सुमारे १०६६.६७ हेक्‍टर इतक्‍या क्षेत्रावर ही लागवड आहे. काजू, आंबा या सारख्या फळपिकाखाली हे क्षेत्र आले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गंत जिल्ह्यात फळबाग लावण्यासाठी १२ तालुक्‍यांना अवघे ७०० हेक्‍टरचे उद्दिष्ट होते.

परंतु जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी लक्ष्यांकापेक्षा अधिक क्षेत्रावर फळपीक लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्याच्याच परिणामी लक्ष्यांकाच्या १५२ टक्‍के क्षेत्रावर फळपीक लागवड झाली आहे.

Fruit Farming
Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट अन् शेडनेटचा यशस्वी प्रयोग

आव्हानांवर केली मात

दुर्गम, आदिवासीबहुल तसेच नक्षलप्रवण असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात योजनांची अंमलबजावणी करणे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत फार आव्हानात्मक राहते. मात्र आलेल्या सर्व अडचणींवर मात करीत कृषीच्या कर्मचाऱ्यांनी फळबाग लागवडीचे उद्दिष्ट गाठले. या कार्याची दखल घेत पुणे येथे नुकत्याच झालेल्या कृषी विभागाच्या कार्यशाळेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांचा कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तालुकानिहाय फळपीक लागवड क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

गडचिरोली : ६५.०१

धानोरा : ७९.८२

मुलचेरा : ७५.०२

वडसा : ७७.७

आरमोरी : ६६.४५

कुरखेडा : १३५.९४

कोरची : २८

अहेरी : ८५.६०

एटापल्ली : २००

भामरागड : ८९.८०

सिरोंचा : ८८.३३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com