Forest Fire : वणव्यात आंब्याची दीड हजार झाडे होरपळली

Mango Crop Burnt : तब्बल चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत झाडे, पाणी पुरवठ्याची यंत्रणा व अन्य साहित्य जळून मोठे नुकसान झाले.
Mango Crop Burnt
Mango Crop Burnt Agrowon
Published on
Updated on

Satara News : डोंगरात फैलावलेला वणवा आंब्याच्या बागेत घुसल्याने चार शेतकऱ्यांच्या बागेतील आंब्याची सुमारे दीड हजार झाडे होरपळल्याची घटना रविवारी (ता. २) दुपारी मस्करवाडी (कसणी, ता. पाटण) येथे घडली. तब्बल चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत झाडे, पाणी पुरवठ्याची यंत्रणा व अन्य साहित्य जळून मोठे नुकसान झाले.

डोंगराच्या कुशीत वसलेल्या कसणी परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या मालकीच्या आंबा व इतर फळझाडांच्या बागा आहे. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कसणीपासून जवळच असलेल्या मस्करवाडी येथे आंब्याच्या बागेत वणवा घुसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली.

Mango Crop Burnt
Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्यात

तोपर्यंत सुमारे सहा एकरांतील बागांचा परिसर आगीने वेढलेला होता. शेतकऱ्यांनी पाणी व झाडांच्या डहाळ्याचा वापर करून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोवर विष्णू आनंदा मस्कर व लक्ष्मण आनंदा मस्कर यांच्या बागेतील २५०, राजू शामराव मस्कर यांच्या बागेतील २५० आणि माजी सरपंच मारुती ज्ञानू मस्कर यांच्या बागेतील सुमारे एक हजार आंब्याची झाडे होरपळली.

Mango Crop Burnt
Forest Fire : सातपुड्यात डिंकासाठी वणवे लावण्याचे प्रकार

तब्बल चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत झाडे तसेच पाणीपुरवठ्याची यंत्रणा व अन्य साहित्य जळून मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जवळच लोकवस्ती आहे. मात्र, आगीवर नियंत्रण मिळविल्याने सुदैवाने घरांचे नुकसान टळले. आगीत वीज पुरवठ्याची यंत्रणाही जळाल्याने त्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

नुकसान भरपाईची मागणी

आगीत जळालेल्या आंब्याच्या बागा सहा वर्षांपूर्वी तयार केलेल्या होत्या. कूपनलिकेद्वारे पाण्याची व्यवस्था केली होती. केशर हापूस जातीचे आंबे आहेत. नुकसानीचा नेमका आकडा रात्री उशिरापर्यंत समजू शकला नाही. आग विझविताना चार जणांना किरकोळ दुखापतही झाली आहे. शासनाने पंचनामा करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com