Kasuri Methi Agrowon
ॲग्रो विशेष

Kasuri Methi Cultivation : दहा गुंठ्यातही होणारी 'कसुरी मेथी' ची फायदेशीर शेती

Rabbi Season : रब्बी हंगामात महाराष्ट्रात येऊ शकणाऱ्या पिकांमध्ये कसुरी मेथी या सुगंधी मसाला पिकाचाही समावेश होतो. पण या पिकाबद्दल शेतकऱ्यांना माहिती नाही आणि त्याप्रमाणात जनजागृतीही झालेली नाहीए.

Radhika Mhetre

Kasuri Methi Crop: रब्बी हंगामात महाराष्ट्रात येऊ शकणाऱ्या पिकांमध्ये कसुरी मेथी या सुगंधी मसाला पिकाचाही समावेश होतो. पण या पिकाबद्दल शेतकऱ्यांना माहिती नाही आणि त्याप्रमाणात जनजागृतीही झालेली नाहीए.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्राच्या माध्यमातून विदर्भात मुर्तीजापूर, पूसद आणि अकोला तालुक्यात शेतकरी गटाच्या माध्यमातून कसुरी मेथी लागवडीचे प्रयोग घेण्यात आले. या प्रयोगातून गटांतर्गत असलेल्या शेतकऱ्यांना १० गुंठ्यातून खर्च वजा जाऊन १ ते दीड लाख रुपयापर्यंत उत्त्पन्न मिळालंय.

कसुरी मेथी लागवडीसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, कसुरी मेथीला भाव काय मिळतो? आणि प्रक्रियेविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्राचे डॉ. श्याम घावडे यांनी दिलेली माहिती पाहुया.

कसुरी मेथीच्या वाळलेल्या पानाचा उपयोग हा पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढविण्यासाठी केला जातो. त्यामुळे कसुरी मेथीला हॉटेल व्यवसायात, कटरिंग, आणि घरगुती वापरासाठीही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

हे पीक एकरी घेण्यासारख नाही त्यामुळे पाच गुंठे दाहा गुंठे इतक्या कमी जागेत कसुरी मेथीचं उत्पादन घेता येत.  या पिकाला जंगली जनावरांचा त्रासही नाही. 

आपण भाजी म्हणून खातो ती मेथी आणि कसुरी मेथी यातील फरक सांगायचा झाला तर  कसुरी मेथीची पाने सुवासिक असली तरी साध्या मेथी प्रमाणे ती कच्ची खाता येत नाहीत. कसुरी मेथीच्या पानात आणि देठात ट्रायगोनेलीन नावाचा सुगंधी पदार्थ असो त्यामुळे कसुरी मेथीला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो. कसुरी मथीचं बियाणं हे साध्या मेथीपेक्षा लहान असतं.तर, झाडाला लागणाऱ्या शेंगा या विळ्यासारख्या वाकड्या असतात. कसुरी मेथीला साध्या मेथीपेक्षा जास्त फांद्या असतात.

तुम्हाला जर कसुरी मेथीची लागवड करायची असेल तर तुमच्याकडे पाण्याची सोय ही असायलाच पाहिजे. कारण या पिकाला वरचेवर पाण्याची गरज असते. खूप भारी किंवा खूप हलकी जमीन न निवडता पोयट्याची, पाण्याचा निचरा होणारी, चुनखडीयुक्त  जमीन लागवडीसाठी योग्य मानली जाते.

लागवड ऑक्टोबरमध्ये करावी. कसुरी मेथीच्या कसुरीसिलेकन आणि के.एफ. २५ या जाती उपलब्ध आहेत. लागवडीपुर्वी बियाण्याला २ ग्रॅम थायरमची प्रक्रिया प्रती किलो बियाणे या प्रमाणात करावी लागते. बियाणे खूप लहान असल्यामुळे बियाणे रेतीत समप्रमाणात मिसळून पेरावे.  नंतर ३० बाय ३० सेंटीमिटर अंतरावर लागवड करावी.

काही ठिकाणी वाफे करुन फेकीव पद्धतीने सुद्धा लागवड करता येते. कसुरी मेथीची जर एक एकरवर लागवड करायची असेल तर ४०० ग्रॅम बियाणे लागते.

खत व्यवस्थापन करताना जमिनीची सुपिकता, लागवडीचा हंगाम आणि जाती यानुसार खतांचं प्रमाण ठरवावं लागतं. लागवडीच्यावेळी २५ किलो नत्र आणि २५ किलो नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावे. पिकाची एकसारखी उगवण होण्यासाठी पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे.

पिकाच्या फुलोरा अवस्थेच्या आगोदर म्हणजे पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसानंतर फांद्या फुटण्यास सुरुवात होते. या काळात पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. कसुरी मेथीवर पांढरी माशी या किडीचा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यावर योग्यवेळी उपाय करावे लागतात.

कसुरी मेथीची वेळेवर काढणी करणं अत्यंत महत्वाच आहे. कारण पाने आणि फांदीच्या मधील भागाला विशिष्ट प्रकारचा वास येतो तेंव्हाच कसुरी मेथीची काढणी करावी लागते. कसुरी मेथीच्या पानात आणि देठात ट्रायगोनेलीन नावाचा सुगंधी पदार्थ लागवडीपासून ६० ते ७० दिवसापासून तयार होतो. त्यानंतर पिकाला फुले येतात.

फुले लागल्यानंतर कसुरी मेथीचं आर्थिक मूल्य कमी होतं. त्यामुळे कसुरी मेथीची वेळेवर काढणी करणं महत्वाचं असतं. त्यासाठी पाने आणि देठाचा वास घ्यावा. विशेष म्हणजे पानांची म्हणजेच फांद्यांची एकापेक्षा जास्त वेळा काढणी करता येते. लागवडीपासून साधारणपने ४० ते ५० दिवसांनी कसुरी मेथीच्या पानांची काढणी करावी. त्याचप्रमाणे पुन्हा ४०ते ४५ दिवसांनी दुसरी काढणी करावी.

कसुरी मेथीचं बिजोत्पादनही घेता येतं. पीक ११५ ते १२० दिवसांच झाल्यानंतर शेंगा तपकिरी होतात. ६० ते ७० टक्के शेंगा तपकिरी झाल्यानंतर शेंगाची काढणी करावी.  शेंगा ७ ते ८ दिवस सुकल्यानंतर काठीने बडवून बियाणे वेगळे करावे. साधारणपने हेक्टरी ४ ते ५ क्विंटल बियाणे मिळते.

कसुरी मेथीचा उपयोग हा प्रोससिंग केल्यानंतरचा आहे. त्यामुळे पाला काढल्यानंतर पाने स्वच्छ धुवून त्यावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया केलेली पाने नंतर उन्हात किंवा ड्रायरमध्ये वाळवली जातात.

१०० किलो पाल्यापासून साधारणपने ८ ते ९ किलो वाळलेला पाला मिळतो. हा वाळलेला पाला वजन करुन व्यवस्थित पॅक करुन विकावा लागतो. मसाला उद्योगातील अनेक नामवंत कंपन्या या पाल्यावर प्रक्रिया करुन कसुरीमेथीची आकर्षक पॅकिंग करुन विक्री करतात. या सुगंधी कसुरी मेथीला साधारणपे प्रती ग्रॅम १ रुपया असा भाव मिळतो. म्हणजे ८ किलो जरी पाला मिळाला तर ८० हजार  रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळू शकतो.

त्यामुळे जास्त फायदा मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी स्वत: प्रक्रिया करुन कसुरी मेथीची विक्री करायला पाहिजे.  पण या पिकाबद्दल तेव्हड्या प्रमाणात जनजागृती झालेली नाहीए त्यामुळे आपले शेतकरी कसुरी मेथी लागवडीकडे वळत नाहीत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठामार्फत  शेतकरी गटामार्फत कसुरी मेथी लागवड तंत्र आणि प्रक्रिया तंत्राचा प्रसार केला जात आहे. अशी माहिती डॉ. श्याम घावडे यांनी दिली.

अशा प्रकारे पीक फेरपालट म्हणून आणि फायद्याचं पीक म्हणून रब्बी हंगामासाठी अतीशय कमी जागेत येऊ शकणाऱ्या कसुरी मेथीचा विचार तुम्ही करु शकता. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT