Team Agrowon
उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असल्यास पालक ची लागवड फायदेशीर ठरते.
मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत चांगली वाढ होते.
सुधारित जाती ःऑलग्रीन, पुसा ज्योती, पुसा हरीत.
बियाणे ः हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे. प्रति किलो बियाणास २ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी.
३ बाय २ मीटर आकाराच्या सपाट वाफ्यामध्ये दोन ओळींत १५ सेंमी अंतर ठेवून करावी.
पेरणीपूर्वी शेणखत मिसळावे. माती परीक्षणानुसार हेक्टरी नत्र ८० किलो, स्फूरद ४० किलो, आणि पालाश ४० किलो द्यावे.
संपूर्ण स्फूरद, पालाश आणि नत्राचा पहिला हप्ता पेरणीच्या वेळी द्यावा. उरलेले नत्र २ समान भागांत विभागून पहिल्या आणि दुसऱ्या कापणीच्या वेळी द्यावे.
पेरणीनंतर त्वरित पाणी द्यावे. त्यामुळे बियांची उगवण चांगली होते. पिकाला नियमित पाणी द्यावे.