Kargil War  Agrowon
ॲग्रो विशेष

Kargil War : ‘कारगिल’ कोठेही होऊ शकते...

India Vs Pakistan : कारगिलचा भाग भारत, पाकिस्तान व चीनसाठी महत्त्वाचा आहे. पाकिस्तानला समजले की भारतीय सेना युद्धाच्या परिस्थितीत नाही, तर ते अधिक आक्रमक पद्धतीने कारगिलसाठी प्रयत्न करू शकतात.

Team Agrowon

Kargil Diwas 2024 : कारगिलचा भाग भारत, पाकिस्तान व चीनसाठी महत्त्वाचा आहे. पाकिस्तानला समजले की भारतीय सेना युद्धाच्या परिस्थितीत नाही, तर ते अधिक आक्रमक पद्धतीने कारगिलसाठी प्रयत्न करू शकतात.

मुशर्रफ यांना त्या वेळी वाटले, की भारतीय सेना तेवढी सक्षम नाही, मात्र त्या वेळी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यात आले होते. चीनने २०२०मध्ये गलवान भागात अतिक्रमणचा प्रयत्न केला होता. त्या क्षेत्रापासून दुसरा सियाचिन निर्माण होईल. त्यामुळे कारगिल आणि सियाचिन या दोन्हींबाबत आपण सावध राहण्याची आवश्यकता आहे.

का रगिलचे युद्ध होण्यामागे अनेक कारणे आहेत. कारगिलचे क्षेत्र सामरिक दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे, तसेच युद्धाच्या दृष्टीने देखील त्यांचे वेगळे स्थान आहे. कारगिलपासून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) जवळ आहे.

तेथूनच पुढे अफगाणिस्तानची सीमा लागते. ते अंतर केवळ ८५ किलोमीटरचे आहे. पाक व्याप्त काश्मीरची रुंदी देखील तेवढीच आहे. या सर्व बाबी विचारात घेता कारगिल पाकिस्तानसाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे.

आजही पाकिस्तान कारगिलसाठी प्रयत्नशील आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या क्षेत्रात असलेला रस्ता. चीनने चायना-पाकिस्तान इकॉनोमिक कॉरिडॉर तयार केला आहे. हा रस्ता कारगिलच्या जवळून जाणारा आहे.

हा रस्ता तेथून जात असल्यामुळे चीनच्या दृष्टीने देखील कारगिल आणि सियाचिन हे दोन्ही परिसर खूप महत्त्वाचे आहेत. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पीओके या क्षेत्रात अनेक नागरिक असे आहेत, की त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहायचे नाही. त्यांना पूर्णपणे भारतात सहभागी किंवा विलीन व्हायचे आहे.

कारगिलच का?

जनरल परवेझ मुशर्रफ हे कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख होते, तर नवाज शरीफ हे पंतप्रधान होते. कारगिल युद्धाच्या वेळेला मी सेवेत असताना चीनच्या लगत असलेली भारतीय सीमा सांभाळण्याची जबाबदारी माझ्याकडे होती.

आम्हाला आधीपासूनच शंका होती की, कधी ना कधी पाकिस्तान कारगिल आपल्यापासून घेण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी वरील कारणे महत्त्वाची होती. याव्यतिरिक्त एक महत्त्वाचे कारण म्हणजे लेहला जाण्यासाठी जो मार्ग जातो तो श्रीनगरपासून कारगिल क्षेत्रातून जातो.

आपण जसे लोणावळ्यावरून मुंबईला जातो, या प्रवासात आपल्याला खंडाळा घाट लागतो. खंडाळा घाट आपल्या कुणाच्या ताब्यात असल्यास आपण तिथून एकही गाडी जाऊ देणार नाही किंवा येऊ देणार नाही.

असेच काहीसे कारगिलच्या बाबतीत आहे. आजही तेथे हीच परिस्थिती आहे. यासाठी मुशर्रफ यांना त्यावेळी वाटले की कारगिलचे क्षेत्र ताब्यात घेणे आवश्यक आहे. कारगिलकडे पाहताना तेव्हा पूर्वीच्या आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये फारसा फरक झालेला नाही. याची तीन कारणे आहेत, कारगिल क्षेत्राची भौगोलिक परिस्थिती आहे तशीच आहे.

चीन पाकिस्तान इकॉनोमिक कॉरिडॉर त्या ठिकाणाहून जात आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीर अद्याप पाकिस्तानकडेच आहे. जम्मू-काश्मीर ते श्रीनगर जाणारा महामार्ग त्याच मार्गावर आहे. दरम्यानच्या काळात एक गोष्ट घडली.

अफगाणिस्तान जवळपास चीनच्या हातात आहे, कारण अफगाणिस्तानला जगामध्ये कोणत्याही राष्ट्राने समर्थन दिलेले नाही. तालिबान-अलकायदा हे तिथे राज्य करत असून, त्यांना कोणीही समर्थन दिलेले नाही.

अफगाणिस्तानचे भौगोलिक क्षेत्र चीनला हवे आहे. या भूमीचा वापर करत चीनचा व्यवसाय इराण आणि मध्यपूर्व आशियामध्ये सुरू आहे, त्यामुळे कारगिलबाबत असलेल्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आता काय करायला हवे?

आपण आपल्या युद्धाच्या तयारीत तसेच सैन्याच्या बाबतीत आवश्यक असलेल्या युद्धाच्या दृष्टीने कोणत्याही बाबीत कपात करू नये. कारण पाकिस्तानला समजले की भारतीय सेना युद्धाच्या परिस्थितीत नाही, तर ते अधिक व्यापक किंवा आक्रमक पद्धतीने कारगिलसाठी प्रयत्न करू शकतात.

मुशर्रफ यांना देखील त्यावेळी वाटले होते की भारतीय सेना तेवढी सक्षम नाही, मात्र त्यावेळी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यात आले होते. चीनने २०२०मध्ये गलवान भागात अतिक्रमणाचा प्रयत्न केला होता. त्या क्षेत्रापासून दुसरा सियाचिन निर्माण होईल.

त्यामुळे कारगिल आणि सियाचिन या दोन्ही चित्रांच्या बाबत आपण सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे, जोपर्यंत कारगिल आपल्या हातात आहे, तोपर्यंत पाकिस्तानला हा धोका सदैव राहील की भारत आपला महामार्ग कापू शकतो. हीच भीती चीनच्या मनात देखील राहील.

अशी रणनीती हवी

कोणत्याही युद्धातून अनेक बाबी शिकायच्या असतात, कारगिलचे युद्ध तसेच होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सैन्यदलाला आदेश दिले होते, की सैन्याने सीमा ओलांडून पीओकेमध्ये जायचे नाही.

हा आदेश चुकीचा होता असे वाटते, कारण आपण जोपर्यंत शत्रूच्या देशात जात नाही, त्यांच्या जमिनीवर आपण आपला तिरंगा रोवत नाही, तोपर्यंत ही जमीन आपल्या नावावर आहे याचा शिक्कामोर्तब होत नाही.

सैन्याला भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय उचित वाटते ते तुम्ही करा, असे स्वातंत्र्य त्यांना द्यायला हवे. आजकल युद्ध क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.रशिया-युक्रेनचे युद्ध, इस्राईल-हमासचे युद्ध ठिकाणी ८० टक्के वापर हा ड्रोनचा होत आहे. अमली पदार्थांचे रॅकेट चालवणे ही मोठी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे.

चीन माणसे आणत नाही, तर ते ड्रोनच्या माध्यमातून कारवाई करतात. त्यामुळे भारतीय संरक्षण क्षेत्राला ड्रोन वापरण्याची क्षमता वाढवायला हवी. तसेच, ड्रोनच्या माध्यमातून ‘पीओके’मधील भागाचे सर्वेक्षण करून आपल्याला ज्या बाबी आवश्यक आहे त्या पुरवाव्यात.

पाकिस्तान किंवा चीनबरोबर भारताचे युद्ध झाल्यास अमेरिका आपली मदत करेल की नाही याबाबत निश्चिती नाही. कोणत्याही देशाची युद्ध संरक्षण क्षमता दुसऱ्या देशासाठी नाही दिली गेली पाहिजे.

या सर्वांपासून योग्य तो धडा भारतीय सैन्याने, राजकीय क्षेत्राने घेतला पाहिजे. कारगिल युद्धाची पुनरावृत्ती होणार नाही याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. कारगिल युद्धानंतर जनरल परवेझ मुशर्रफ भारतात आले होते.

त्यावेळी ते पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भेटले. आपल्या संरक्षण मंत्र्यांची त्यांनी गाठ घेतली. परराष्ट्र मंत्रालयात त्यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित केली होती.

त्यात ते म्हणाले होते की, आता फक्त एकच कारगिल झाले आहे; आगामी काळात आणखीन दहा कारगिल होतील. हे त्यांचे वक्तव्य आजही रेकॉर्डवर आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विचार करता कारगिलचे युद्ध हे केवळ कारगिल युद्ध क्षेत्रावरच नाही, तर ते मुंबईत होऊ शकते.

२६/११चा बॉम्ब हल्ला त्याचे उदाहरण आहे. यापूर्वी आपल्या संसदेवर हल्ला झालेला आहे. बॉम्बस्फोटाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात कारगिल हे केवळ कारगिलमध्ये होणार नाही, भारतामध्ये कुठेही होऊ शकते. त्यासाठी आपल्याला आपली सागरी सीमा अधिक सुरक्षित करण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT