Milk Fat : या कारणांमुळे कमी होऊ शकते दुधातील फॅट

Team Agrowon

दुधातील फॅट आणि एसएनएफ च्या प्रमाणावर प्रती लिटर  दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रमाण अवलंबून असते. म्हणून दुधातील प्रत्येक घटकाचे प्रमाण हे महत्त्वपूर्ण आहे.

Milk Fat | Agrowon

गाय, म्हैस आणि शेळीच्या दुधातील घटकांच्या प्रमाणात व दूध उत्पादनात प्राणीनिहाय फरक हा आढळतोच. याशिवाय  एकाच प्रकारच्या जनावरांच्या अनेक जाती आढळतात.जस की, एचएफ आणि जर्सी गाय या दोन्ही गायीच्या दुधाच्या घटकात फरक दिसून येतो. 

Milk Fat | Agrowon

गाय विल्यानंतर दूध देण्याच्या सुरुवातीच्या काळापासून ठराविक वेळेपर्यंत म्हणजे तीन महिन्यापर्यंत  दुधातील फॅटचे प्रमाण वाढत जाऊन पुढे हळू-हळू कमी होते.

Milk Fat | Agrowon

पहिल्या वेतापासून तिसऱ्या वेतापर्यंत दुधासोबतच दुधातील फॅटच  प्रमाणही थोड थोड वाढत. नंतर ते स्थिर राहून कमी होत जात.

Milk Fat | Agrowon

एकाच जातीच्या गायीना सारखच खाद्य दिल आणि  व्यवस्थापन देखील सारखच असल, तरी देखील त्यांचे एकूण दूध उत्पादन आणि दुधातील घटकांमध्ये फरक हा असतोच. काही वेळेस हा फरक आनुवंशिक कारणामुळे सुद्धा असू शकतो.

Milk Fat | Agrowon

दुधातील फॅटचे प्रमाण उन्हाळ्यात थोडे कमी आणि हिवाळ्यात थोडे जास्त असते. हाच फरक दूध उत्पादनात देखील आढळतो.

Milk Fat | Agrowon

दूध काढण्याच्या वेळांमधील अंतर १२ तासांपेक्षा जास्त अंतर असेल, तर जास्त वेळानंतर काढलेल्या दुधाचे प्रमाण जास्त पण फॅटचे प्रमाण कमी राहील.

Milk Fat | Agrowon

गायीच्या एकाच वेळेला दुध काढण्याच्या सुरवातीच्या धारांमध्ये स्निग्धांश कमी, तर शेवटच्या धारांमध्ये स्निग्धांश बऱ्याच प्रमाणात जास्त असतो.

Milk Fat | Agrowon