Farmer Protest: कांद्याच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी दरामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न संकटात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सात दिवसांचे ‘फोन करो’ आंदोलन हाती घेतले असून, राज्यभरातील शेतकऱ्यांनी मंत्री, खासदार, आमदार यांना सतत फोन करून कांद्याच्या दरवाढीची मागणी केली आहे.